शिरूर कासार : सध्या वाढते उष्णतामान आणि होणाऱ्या बाष्पीभवनामुळे जलाशयातील पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे तर विंधन विहिरीचीही पाणी पातळी घटली असल्याचे तालुक्यातील शेतकरी बोलत आहेत. पाण्याचा वापर नियोजनपूर्वक केल्यास टंचाई टाळता येणार आहे.
बाजरीला दाणे चमकू लागले
शिरूर कासार : तालुक्यात उन्हाळी बाजरी पेरा मोठ्या प्रमाणावर झाला असून या बाजरीला आता चांगले दाणे चमकत आहेत तर काही ठिकाणी बाजरीची काढणी सुरू झाली असून पावसाळी बाजरीपेक्षा उन्हाळी बाजरीचा उतारा व दर्जा चांगला असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांकडून कांद्याच्या सुरक्षेसाठी धडपड
शिरूर कासार : चांगला भाव मिळेल या आशेने तालुक्यात शेतकऱ्यांनी कांदा लागवड करून जोपासना केली. आता कांदा काढणीला आला आहे. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पडणारा हलकासा पाऊस हा कांद्याला बाधा ठरणारा असल्याने शेतकरी काढलेल्या कांद्याच्या ढिगाऱ्यावर आवरण टाकण्याच्या कामाला लागले आहेत.
बसस्थानक ओस पडले
शिरूर कासार : प्रवाशांची सतत वर्दळ असलेले बसस्थानक ओस पडले असून त्याची बकाल अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे बससेवा बंद असल्याने स्थानक ओस पडले आहे. परिसरात कोणीही नसल्याने मद्यपींना मात्र निवांत जागा सापडली आहे.