शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

पाणीपातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 4:14 AM

.... गादी व्यावसायिक अडचणीत अंबाजोगाई : गेल्या दीड वर्षापासून लग्नसराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. याशिवाय लॉजिंगही बंद आहे. शाळा, ...

....

गादी व्यावसायिक अडचणीत

अंबाजोगाई : गेल्या दीड वर्षापासून लग्नसराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. याशिवाय लॉजिंगही बंद आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने वसतिगृहेही ओस पडली आहेत. परिणामी गाद्यांची मागणी कमालीची घटली असून, गादी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या व्यावसायिकांना कुटुंब चालवणे अवघड झाल्याने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी केली आहे.

....

धूम्रपानामुळे आजार

अंबाजोगाई : आहाराच्या बदलत्या सवयी, अमलीपदार्थांचे मोठ्या प्रमाणात केले जाणारे सेवन, मद्यपान, धूम्रपान यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील बदलामुळे खासगी रुग्णालयांमध्येही गर्दी वाढू लागली आहे. धूम्रपानावर बंदी असतानाही धूम्रपान करणा‌ऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. या प्रकारावर निर्बंध घालाो, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष मोहिते यांनी केली आहे.

....

कर्जवसुली थांबवा

अंबाजोगाई : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ बंद आहे. सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील महिला बचतगटांना बँकांनी दिलेल्या कर्जाची वसुली काही काळ थांबविण्यात यावी. या कालावधीतील व्याजदरही रद्द करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश गोस्वामी यांनी केली आहे.

...

ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांची दैना

अंबाजोगाई : शहरातील विविध उपनगरांमध्ये अनेक बांधकामे सुरू आहेत. यासाठी खडी, वीट, वाळू, घेऊन येणा‌‌ऱ्या ओव्हरलोड डम्परमुळे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे. या वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश दहातोंडे यांनी केली आहे.