मनुष्यप्रजातीवर आलेले कोरोनाचे महाभयंकर संकट आणि या परिस्थितीत मनुष्य जीव वाचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे पराकोटीचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मुक्त संचार करणाऱ्या पशु ,पक्ष्यांची व्यथा लक्षात घेत त्यांची तहान भागवण्यासाठी मानवी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
कडकडीत बंद आणि तीव्र उन्हात मुक्या जीवांची फरफट होऊ नये म्हणून आधार माणुसकी ग्रुपच्या माध्यमातून ‘जिथे पाणी तिथे पाणवठा’ ही संकल्पना येथील पोलीस रणजित पवार यांनी मांडली. शहरी, ग्रामीण भागात पशु,पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जवळपास १० पाणवठे उभारले आहेत. त्याचा प्रारंभ श्रीराम नवमीचे औचित्य साधून शहरातील बाजार तळ, बेलगाव, देवपिंपरी, गोविंदवाडीसह अशा दहा ठिकाणी पाणवठे केले आहेत. यावेळी पोलीस रंजित पवार, रामेश्वर जगताप, नारायण खटाने, आदिनाथ पवार, प्रकाश गव्हाणे, पोलीस अंमलदार भारत देशमुख, श्रीकांत चौधरी, भागवत लखोटे, वाल्मिक मावस्कर, किरण मोरे, एकनाथ लाड, प्रकाश आडे, हनुमान सुळ, सखाराम शिंदे, पप्पू मोहरकर, भागवत जाधव, किरण बेदरे, उमेश बेदरेंसह अनेक जण उपस्थित होते.
===Photopath===
230421\sakharam shinde_img-20210421-wa0034_14.jpg