....
मंदिरे उघडण्याची मागणी
धानोरा : आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छींद्रनाथ देवस्थान, आडबंगीनाथ, जानपीर येथील नाथांच्या मंदिरांसह अनेक मंदिरे बंद आहेत. येथील उत्सव, यात्राही कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद आहेत. तरी कोरोना नियमांच्या अटींचे बंधने घालून मंदिरे उघडावीत, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
...
सीना धरणातील पाणीसाठ्यात घट
आष्टी : आष्टी तालुक्यातील अनेक गावांना वरदान ठरणाऱ्या सीना धरणाचा पाणीसाठ्यात घट झाली आहे. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. निम्मा पावसाळा संपत आला, तरी धरणात नवीन पाण्याची आवक झाली नाही. कुकडी प्रकल्पातील धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे, तरी कुकडी प्रकल्पातून सीना धरणात पाणी सोडावावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
....
रानडुकरांकडून चारा पिके फस्त
धानोरा : आष्टी तालुक्यात रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या शेतातील मका, कडवळ व इतर चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांच्या ठिबक संचाचेही नुकसान केले आहे. चारा पिके फस्त झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तरी रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
....
चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने घबराट
धानोरा : आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या आठवड्यात दोन, चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. याशिवाय अनेक ठिकाणी भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात पाऊस नसल्याने दुष्काळाचे सावट आहे. यामुळे रानशेतात राहणाऱ्या नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे, तरी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
.....