परळी : तालुक्यातील वडखेल येथील एका शेतकऱ्यांने पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीकडे जाणारा रस्ता बंद केल्याने मागील वीस दिवसांपासून गावचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. प्रशासनाने तात्काळ संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करून पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी वडखेलचे ग्रामस्थ शामसुंदर महाराज सोन्नर, प्रकाश चव्हाण व गणेश देवकते यांनी ग्रामसेवकाकडे केली आहे.
प्रकाश चव्हाण म्हणाले, तालुक्यातील वडखेल येथे पंधरा वर्षांपुर्वी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. दुष्काळाचा अपवाद वगळता ग्रामपंचायत सतत पाणी पुरवठा करीत असते. विहिरी लगतच्या एका शेतकऱ्याने विहिरीच्या आजुबाजुला दगडाचे ढिगारे टाकून रस्ता बंद केला आहे. मागील २० दिवसांपासून रस्ता बंद असल्याने ग्राम पंचायतच्या कर्मचाऱ्यांनी पाणी सोडणे बंद केले आहे. शिवाय याबाबतचे पत्र ग्रामसेवकाकडे दिलेले आहे.
पाणी पुरवठा करणारी विहीर नदिच्या काठावर आहे. संबंधित शेतकऱ्यांनी नदीपात्रात दगडाचे ढिगारे टाकलेले आहेत. तीव्र उन्हाळा व कोरोनाचा संसर्ग असतानाही ग्रामस्थांना पाण्याची सोय असुनही वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाने तात्काळ दखल घेउन गावचा पाणी पुरवठा पुर्ववत करावा अशी मागणी वडखेलच्या ग्रामस्थांनी केली आहे.
===Photopath===
060521\img-20210506-wa0455_14.jpg