बीड : कोरोना आजाराने राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे ते नष्ट करून आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मदतीचे आवाहन केले जात आहे. ७ दिवस २४ तास सेवेत असणारा आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाकडून ‘आम्ही कर्तव्यावर आहोत, फक्त तुम्ही घराबाहेर पडू नका’ असे आवाहन केले जात आहे. सोशल मीडियावरूनही या दोन्ही विभागाबद्दल सहानुभूतिपूर्वक संदेश फिरत आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ४ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. पैकी चौघांचे घशाचे नमुने तपासणीस घेऊन ते प्रयोशाळेत पाठविले होते. सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सध्या विदेशासह पुणे, मुंबई, नागपूरहून बीडला येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे सर्व बाधित देशातून आणि जिल्ह्यातून येत असल्याने आलेल्या प्रत्येकावर आरोग्य विभाग नजर ठेवून आहे. जिल्हा प्रशासनही उपाययोजना करण्यासाठी दिवसाला पाच ते सहा बैठका घेत आहेत.दररोज नव नवीन सुचना व आदेश दिले जात आहेत. अशातच रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे. आरोग्य विभागासह पोलीस प्रशासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृतीसह आवाहन केले जात आहे. हा आजार संपूष्टात आणण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, काळजी घ्यावी. आम्ही आपल्यासाठी कर्तव्यावर आहोत, फक्त तुम्ही सहकार्य करा, असे आवाहन केले जात आहे.सोशल मीडियावरून भावनिक सादरविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमिवर सोशल मीडियावरून नागरिकांना आवाहन करण्यासह भावनिक साद घालणारे संदेश फिरविले जात आहेत तसेच हातात पाटी घेतलेले फोटो असून त्यावर ‘आम्ही कर्तव्यावर आहोत, तुम्ही घरातच थांबा बसा,’ असे वाक्य लिहून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले जात आहे.
आम्ही कर्तव्यावर; तुम्ही घरातच थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:19 PM
कोरोना आजाराने राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे ते नष्ट करून आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मदतीचे आवाहन केले जात आहे.
ठळक मुद्देपोलीस, आरोग्य प्रशासनाकडून आवाहन : ७ दिवस, २४ तास सेवा बजावण्यासाठी तत्परता; सोशल मीडियातूनही साद