कडा (बीड ) : लग्न सोहळ्याला काही मिनिटाचा अवधी असताना अचानक आलेल्या वावटळीने मंडप उडाला. यावेळी मंडपाचा ढाचा असलेली लोखंडी पाईप वऱ्हाडावर कोसळ्याने दहा ते बाराजण जखमी झाल्याची घटना अंभोरा येथे आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील अंभोरा येथे दुपारी 'खाकाळ आणि मराठे' असा विवाह सोहळा होता. लग्नाला काही मिनिटांचा अवधी असताना लग्न कार्य परिसरात अचानक वावटळ आली. प्रचंड वेगाने वावटळ मंडपमध्ये घुसली, यामुळे मंडप उडाला आणि त्याचा लोखंडी ढाचा खाली बसलेल्या वऱ्हाडी मंडळींवर कोसळला. यात दहा ते बाराजण जखमी झाल्याची माहिती आहे. पुष्पा पंडित, सलमा शेख, परसराम पवार, बाबु थोरात हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
१५ दिवसातील दुसरी घटना ७ मे रोजी आनंदवाडी येथील चौधरी वस्तीवर वावटळीने लग्न मंडप उडाल्याची घटना घडली होती. यावेळी वीस ते पंचवीस वर्हाडी जखमी झाले होते.