माजलगाव : शहरातील विविध भागात घाण साचली आहे. या घाणीची स्वच्छता होत नसल्यामुळे विविध आजारांचा प्रसार वाढला असून न.प.ने स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.
डासांचा उपद्रव वाढला
अंबाजोगाई : शहर व नव्याने विकसित होत असलेल्या सिल्वरसिटी परिसरात बांधकाम न झाल्याने रस्त्यावर पाणी साचते. रिकाम्या जागेत पाण्याचे डोह साचल्याने उत्पत्ती वाढून डासांचा उपद्रव वाढला आहे. यावर उपाय करण्याची मागणी होत आहे.
बस सुरू करा
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झाली नाही. बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अॅपे, रिक्षा या अवैध वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी आहे.
अवैध धंदे सुरूच
माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसारात कलह वाढत चालले आहेत.
कडब्याचे भाव वाढले
अंबाजोगाई : तालुक्यात उसाची लागवड व हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. ज्वारीचे पीक लावल्यानंतर ज्वारी सांभाळणे जिकरीचे काम आहे. ज्वारीचा पेरा तुलनेने कमी झाल्याने यंदा कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. सध्या कडब्याचे भाव कडाडले आहेत. २५ ते ३० रूपयांना पेंडी विकली जात आहे.