शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बीडमध्ये बाप्पांचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:39 AM

पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला... यासारख्या गाण्यांवर गणेश भक्तांनी ठेका धरत लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया...’ असा जयघोष करीत गणेश भक्तांनी गणरायाची मिरवणूक काढली. लाडक्या बाप्पांना घरी नेण्यासाठी बााजरात दिवसभर गणेश भक्तांची लगबग दिसून आली.

बीड : पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला... यासारख्या गाण्यांवर गणेश भक्तांनी ठेका धरत लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया...’ असा जयघोष करीत गणेश भक्तांनी गणरायाची मिरवणूक काढली. लाडक्या बाप्पांना घरी नेण्यासाठी बााजरात दिवसभर गणेश भक्तांची लगबग दिसून आली.

पंधरा दिवसांपासून गणेश मंडळांकडून गणरायाच्या स्वागताची तयारी केली जात होती. गतवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे भक्तांचा आनंद द्विगुणित झाला होता. परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्याने उत्साह थोडा कमी जाणवला.

तरी सुद्धा श्रद्धा म्हणून सकाळी आठ वाजेपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडत गणेश मूर्ती खरेदी केल्या. संपूर्ण कुटूंब सहभागी होत अनेकांनी बाप्पांची मिरवणूक काढली. दुपारपर्यंत हा ओघ कायम होता. बीडमधील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरात लावलेल्या स्टॉलच्या ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास मोठ्या गणेश मंडळांनी मिरवणूका काढण्यास सुरूवात केली. अनेकांनी पारंपरिक वाद्याला अधिक महत्व दिले.

ढोल, ताशा, लेझीम अन् डॉल्बीच्या तालावर भक्तांनी लाडक्या बाप्पांचे स्वागत केले. मिरवणूकीनंतर विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना केली.जिल्ह्यात १४४० ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आलेली आहे. ३६० गावांमध्ये एक गाव एक गणपती, ६३ गावांमध्ये एक गाव दोन गणपती, तर ६ ठिकाणी दोन गाव एक गणपती संकल्पना राबवि यात आली. यामुळे गणेशोत्सवात मदतच होणार असल्याचे विशेष शाखेचे सपोनि ए. एच. जगताप यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत जिल्हा विशेष शाखेचे पथक ही माहिती गोळा करीत होते.

बीडमध्ये पोलिसांची मनमानीबीड शहरात वाहन पार्किंगसाठी सिद्धीविनायक कॉम्प्लेक्सचा परिसर आहे. येथे स्टॉल उभारल्याने अनेकांनी वाहने सुभाष रोडवर उभी केली. हीच संधी साधून पोलिसांनी या वाहनांवर कारवाई केली. पार्किंग व्यवस्थाच नसेल तर वाहने लावायची कोठे, असा सवाल उपस्थित करीत पोलिसांच्या मनमानीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. दिवसभर शहरात पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. बीड पोलिसांच्या हलगर्जीपणाचा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वाहतुकीतील बदलाची कसलीही कल्पना नागरिकांना दिलेली नव्हती. तसेच कसलेही नियोजन केले नसल्याचे दिसून आले.माजलगाव तालुक्यात १४० मंडळांची आॅनलाईन नोंदणीमाजलगाव : तालुक्यात १४० गणेश मंडळांनी गुरूवारी दुपारपर्यंत आॅनलाईन नोंदणी केली. मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केली असून ग्रामीण भागात ५० तर शहरी भागात ७० मंडळांनी आॅनलाईन परवानगी घेतली आहे. २० गावांत एक गाव एक गणपती बसविण्यात आला आहे. एका ठिकाणी दोन गाव एक गणपतीची नोंद करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, माजलगाव शहरातील नावाजलेले शिवाजी, गणेश, क्रांती, नवतरुण, छत्रपती, राजस्थानी, मोंढा, कालिका, नवतरुण, स्वराज्य आ दी गणेश मंडळांनी गणेशोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. गणेशोत्सव शांततेत आणि सामाजिक सलोख्यात साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.नवगण राजुरीत ग्रामदेवतांना जलाभिषेकनवगण राजुरी येथे गणेशोत्सवानिमित्त गंगेचे पाणी कावडीने आणत नवगणेशाला व ग्रामदेवतांना जलाभिषेक घालण्यात आला.गावातील २०० युवकांनी शहागड येथून गोदावरी नदीचे पाणी कावडीने आणले. यावेळी कावडीचे सवाद्य स्वागत करण्यात आले.जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर, मंगलमूर्ती देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, आचार्य अमृताश्रम महाराज, सरपंच गणेश ससाणे, उपसरपंच भगवान बहिर, माउलीअण्णा बहिर, मोहन देशमुख यांच्यासह गणेश भक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडGaneshotsavगणेशोत्सवMarathwadaमराठवाडा