बीड : कोरोनाबाधित अर्थव्यवस्थेमुळे नीट, जेईईचे स्वप्न बाळगणाऱ्या गरजूंचे शिक्षण थांबणार नाही. दहावीमधून अकरावीत, तर अकरावीतून बारावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी मोफत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेसची शिखर संघटना प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष तथा प्रोफेशनल करिअर अकॅडमी, बीडचे संचालक प्रा. विजय पवार यांनी घेतला आहे. मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणूमुळे प्रामुख्याने शिक्षण व्यवस्था सर्वांत जास्त अडचणीत आली आहे. देशाचे भविष्य असणारी तरुण पिढी शिक्षणाविषयी संभ्रमात, तर पालक चिंतेत आहेत. ९५ टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे. नव्या पिढीने नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. त्यात सर्वच शिक्षणामधील बदल हे विद्यार्थी व पालकांसमोर आव्हान ठरत आहे. यात ग्रामीण भागामध्ये शेतकरी आणि शेतमजुरांचे पाल्य भरडले जात असताना सामाजिक बांधीलकी म्हणून हा निर्णय घेतल्याचे प्रा. पवार म्हणाले. प्रोफेशनल करीरिअर अकॅडमीच्या वतीने अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांना नीट, जेईईच्या दृष्टीने शिक्षण मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण वर्ष मागीलप्रमाणे याही वर्षी वाया जाऊ नये म्हणून शिक्षणाचा गाळात रुतलेला हा रथ पुढे ओढण्यासाठी व ग्रामीणचा विद्यार्थी या प्रवाहातून बाहेर पडू नये या उद्देशाने प्रा. पवार यांनी घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी मैलाचा दगड ठरत आहे. या बॅचमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि आधार कार्डचा फोटो व्हॉट्सॲप करायचा आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरु सुरू झालेला हा उपक्रम असून ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, त्याच विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे सूचित केले आहे. या बॅचेसची ऑनलाईन सेवा मिळविण्यासाठी प्लेस्टोरवर जाऊन प्रोफेशनल करिअर अकॅडमी हे ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे. तसेच डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी प्रोफेशनल करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ही सेवा मिळविता येऊ शकेल.
आपले इच्छित ध्येय आणि स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यामधील आणि एकूणच गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांनी प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे अद्ययावत प्लॅटफॉर्म वापरून घेरण्याचे आवाहन प्रोफेशनलचे संचालक प्रा. विजय पवार यांनी केले आहे.