लोकमत न्यूज नेटवर्कबीड : संत सावतामाळी यांच्या अरण संस्थेचा विकास करण्यासाठी मी प्रमाणिकपणे सारी शक्ती पणाला लावणार आहे. माळी समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मात्र यापूर्वी माळी समाजाचे मंत्री झाले होते त्यांनी समाजाला काय दिले असा सवाल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. त्या सावता परिषदेच्या चौथ्या त्रैवार्षिक अधिवेशनानिमित्त माळी समाजाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.यावेळी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर, सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे, खा.डॉ.प्रीतम मुंडे, आ.संगीता ठोंबरे, शिवसेनेचे शंकर बोरकर, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे यांच्यासह सावता परिषदेचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थितीती होती. माळी समाजातील प्रलंबीत मागण्या व समाजाच्या पुढील वाटचालीसाठी सावता परिषदेच्या वतीने हा मेळाव्याचे आयोजन बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात गुरुवारी करण्यात आले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी माळी समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची खंत पदाधिका-यांनी व्यक्त केली, तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास सरकार खाली खेचण्याची ताकद माळी समाजात असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सरकार खाली खेचण्याच्या वक्तव्यावर बोलताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी अरणला गेले त्यावेळी तिथे जाण्यासाठी रस्ता देखील चांगला नव्हता, मी साडेतीन कोटीचा निधी तिथे दिला आहे. समाजाचा विकास करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. त्यामुळे सरकार खाली खेचण्याची भाषा योग्य नाही, सरकारच्या मागे खंबीरपणे उभे रहा, भाजप सरकारमध्ये समाजाचे चार आमदार आहेत. त्यामुळे समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ताकद पणाला लावली जाईल, तसेच इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे अरणला देखील १०० कोटींचा निधी विकासासाठी देण्यात येणार आहे. त्याचसोबत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना भेटणार असल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी खा.प्रीतम मुंडे, परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, महादेव काळे, शंकर बोरकर यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले.मुंडे यांच्या समक्ष सरकार पाडण्याचा इशारामहात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, तसेच ओबीसी आरक्षण कायम राहावे, समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ अदा करण्यात यावे, ओबीसी महामंडळासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अरण तीर्थक्षेत्रासाठी १०० कोटीची तरतूद करण्यात यावी, कल्याण आखाडे यांना मंत्रीपद देण्यात यावे, या मागण्या करण्यात आल्या, तसेच मागण्या मान्य न झाल्यास सरकार पाडण्याचा इशारा परिषदेच्या पदाधिकाºयांनी पंकजा मुंडे व इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दिला.
जातीच्या शिड्या वापरून मंत्री झालेल्यांनी काय दिले?- मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 1:15 AM