भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी ७ ते १० या वेळेत होईल, ते किरकोळ विक्रेत्यांना माल विक्री करतील. हे किरकोळ विक्रेते सकाळी ७ ते १२ या वेळेत गल्लोगल्ली फिरून विक्री करतील. खाजगी दवाखाने, मेडिकल सुरू राहतील. ऑनलाइन औषध वितरण दवाखान्याशी संलग्न असलेली दुकाने २४ तास सुरू ठेवता येतील. सर्व न्यायालये, राज्य, केंद्र शासनाची कार्यालये ५० टक्के उपस्थितीमध्ये सुरू ठेवता येतील .
पोलीस पेट्रोल पंप, साई पेट्रोल पंप हे दोन पंप सुरू राहतील. येथे पोलीस व इतर शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी, घरगुती गॅस, पिण्याच्या पाण्याचे वितरण करणारी वाहने, दैनिक वर्तमानपत्र, नियतकालिके, डिजिटल प्रिंट मीडिया, शासकीय कार्यालये सुरू राहतील.
अंत्यविधी साठी २० लोकांना परवानगी असेल. स्वस्त धान्य दुकाने सकाळी बारापर्यंत सुरू राहतील .सर्व
केशकर्तनालये, ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णत: बंद राहतील.
सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत: बंद राहतील. तथापि अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील. सोबत ओळखपत्र, पूर्व परवानगी, वैद्यकीय कारण असेल तर त्यासंबंधीचा पुरावा प्रवास करताना द्यावा लागेल.
सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादी संपूर्णत: बंद राहतील. तथापि कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे बीड जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतचे, पोलीस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी पूर्वपरवानगी असलेली घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहेत.
बीड जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालये संपूर्णत: बंद राहतील. परंतु , ३१ मार्च २१ अखेरीस ताळमेळ, बँकेत चलन भरण्याची कामे करण्यास परवानगी असेल. (दुकानाचे शटर बंद करून आत क्लोजिंगचे कामे करण्यास जास्तीत जास्त तीन व्यक्तीस परवानगी असेल.)
सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. अन्यथा संबंधित व्यक्ती अथवा संस्था कारवाईस पात्र राहील.