शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
2
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
3
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
4
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
5
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
6
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
7
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
8
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
9
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
10
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
11
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
12
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
13
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
14
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
16
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
17
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
18
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
19
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
20
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?

'मासा लागला गळाला, नगरसेवक कुठे पळाला'; परळीत रस्त्याच्या प्रश्नावरून झळकले बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 8:39 PM

रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांनी गांधीगिरी करत बॅनर लावले आहे.

परळी ( बीड): 'कोणी रस्ता देता का रस्ता', 'मासा लागला गळाला, नगरसेवक कुठे पळाला', 'फक्त मत मागायला येता ओ शेठ, तुम्ही नादच केला थेट'; असा मजकूर लिहलेले बॅनर परळीत झळकले आहे. रस्त्याची अवस्था अंत्यंत खराब झाल्याने त्रस्त नागरिकांनी व्यथेची याद्वारे वाचा फोडली आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील सिद्धेश्वर नगर भागातील रस्त्याची दुरावस्था झाल्याने  या भागातील नागरिकांनी गांधीगिरी करत  राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात मंगळवारी रात्री बॅनर लावले. हे बॅनर कोणीतरी फाडल्या मुळे बुधवारी पुन्हा दुसरे बॅनर त्याच ठिकाणी लावले. बुधवारी अनधिकृत बॅनरच्या नावाखाली नप कर्मचाऱ्यांनी हे बॅनर खाली उतरविले, त्याच्या निषेधार्थ बॅनरची वाजत गाजत व घोषणाबाजी करीत टॉवरपासून प्रभाग 5 मध्ये नागरिक व कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढत पुन्हा गांधीगिरी केली. बॅनर लावून रस्त्याचा प्रश्न लावल्याने प्रशासनाला याची दखल घेईल आणि लवकर दुरुस्ती होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

परळी शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील सिद्धेश्वर नगरचे नागरिक रस्त्याच्या दुरावस्थे मुळे हैराण झाले आहेत.नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी  नागरिकांनी गांधीगिरी करीत बॅनर लावले. बॅनर लावण्याच्या संदर्भात नागरिकांनी परळी नगरपालिकेला एक निवेदनही दिले होते - श्रीनिवास राऊत, सामाजिक कार्यकर्ता, प्रभाग क्रमांक5  परळी

टॅग्स :Beedबीडroad safetyरस्ते सुरक्षा