- अनिल लगड सावरगाव घाट (जि. बीड) : ओबीसी व मराठा समाजात आरक्षणावरून भांडणे लावण्याचे काम सुरू आहे; पण ओबीसी आणि मराठा एकच आहेत. मी दोन्ही प्रश्न लावून धरणार आहे. ओबीसी व मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशारा माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांना दिला.संत भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे विजयादशमीनिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. ओबीसींना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही. मराठा आरक्षण भेटल्याशिवाय हार स्वीकारणार नाही, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.मेळाव्यास माजी मंत्री महादेव जानकर, खा. डॉ. प्रीतम मुंडे, खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, भीमराव धोंडे, आ. नमिता मुंदडा व नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.मदतीचे पॅकेज तोकडेअनेक माणसे उपाशी आहेत. ज्यांची पोटं भरलेली आहेत. त्यांचेच पोट आणखी मोठे झाले आहे. कोरोनात आम्हीही मदत केली. अतिवृष्टीत खासदार प्रीतम मुंडे व मी दौरे केले. सरकारने पॅकेज दिले ; पण कमी दिले. ते तोकडे आहे. आणखी मोठी मदत द्या, अशी मागणीही पंकजा यांनी यावेळी केली.
सत्ता असो वा नसो, Maratha Reservation, OBC reservationसाठी लढणार - Pankaja Munde
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 7:16 AM