आष्टी : तालुक्यातील मोराळा सजाचे तलाठी बाळू बनगे यांनी जमीन नावे करणे आणि अनुदान मिळून देण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी केली होती. यानंतर तडजोडी अंती ३००० रुपये लाच स्विकारण्याचे त्यांनी मान्य केले असता ते एसीबीच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात करण्यात आली. तलाठी बनगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एका शेतकऱ्यास वाटणीपत्राप्रमाणे भाऊ,आई, वडिल, बहिण यांच्या नावे शेती करण्यासाठी आणि अनुदान मिळून देण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी तालुक्यातील मोराळा सजाचे तलाठी बाळू बनगे यांनी केली होती. याबाबत शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यानंतर मंगळवारी बसस्थानक परिसरात तलाठी बनगे यांनी तडजोडी अंती ३००० रुपये स्विकारण्याचे मान्य केले. याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधिक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय.रविंद्र परदेशी, पोलिस नाईक श्रीराम गिराम, पो शि.भारत गारदे, पो शि संतोष मोरे यांनी केली. या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला आष्टी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.