शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

अर्ज दाखल करताना उमेदवारासह पाच जणांनाच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:43 PM

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारासह पाच प्रतिनिधींना निवडणूक र्णिय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी दिली बैठकीत माहिती : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

बीड : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारासह पाच प्रतिनिधींना निवडणूक र्णिय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. सार्वत्रिक निवडणूकीच्या काळात ३९-बीड लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू झाली असून राजकीय पक्षांनी आणि प्रतिनिधींनी त्याच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करतांना उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ५ प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येईल यासाठी सोबत अणावयाची वाहने, तसेच इतरप्रसंगी आचार संहितेनूसार बंधने पाळली जावीत, असे ते म्हणाले.जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मतदारसंघात स्टार प्रचारकांच्या प्रचार सभा, प्रचार आदीवेळी कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगितले. सीईओ अमोल येडगे यांनी निवडणूक काळात भरारी, निगराणी पथके कार्यरत असून आचार संहिता भंगाच्या तक्र ारींची तातडीने दखल घेण्यात येईल असे सांगितले.याप्रसंगी निवडणूकीची तयारी, निवडणूक कार्यक्र माचा दिनांक देऊन प्रचार व प्रसिध्दीसाठी सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रुपीकरणापासून संरक्षण आदींसाठी नियम यांची माहिती देण्यात आली. तसेच आदर्श आचार संहिता मार्गदर्शक तत्वांच्या मराठी व इंग्रजी भाषेतील प्रती देण्यात आल्या. बैठकीसाठी कॉँग्रेस, बहुजन समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस आदी पक्षांचे शेख अफसर, नामदेव चव्हाण, बबनराव गवते, सचिन शेळके, माणिक खांडे, महादेव डोके, विजय पांडूळे प्रतिनिधी उपस्थित होते.दरम्यान निवडणूका शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्याबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाकडून शस्त्रास्त्रांबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आदेश असून, त्यानुसार निवडणूका जाहिर झाल्यापासून शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध घालण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक