लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शेतक-यांना अंधारात ठेवत दोन दिवसांपूर्वीच शासकीय खरेदी सुरु करुन व्यापाºयांचा माल खरेदीसाठी येथील पांढरपेशांनी लढवलेल्या नामी युक्तीचा भांडाफोड १६ नोव्हेंबर रोजी झाला. त्यानंतर शासनाने महसूल व सहायक निबंधकांच्या पथकाद्वारे केलेल्या पंचनाम्यातून आणखीही बºयाच बाबी उघड होत असून, शासकीय खरेदी केंद्रावर पांढरपेशांनी मोठा काळा बाजार केल्याचे किमान पंचनाम्यावरुन निदर्शनास येत आहे.माजलगांव येथे शीतल कृषि निविष्ठा सहकारी संस्था, गिरवली या सहकारी संस्थेला मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी शासनाने नियुक्त केले आहे. खरेदीसाठी अधिकृतरित्या सदर संस्थेची नियुक्ती जरी शासनाने केली असली तरी येथील कांही पांढरपेशा नेत्यांनी या सहकारी संस्थेला हाताशी धरुन आर्थिक तडजोड करीत शेतकरी नोंदणीचे काम आपल्या हाती ठेवले. १५ दिवसांपासून नोंदणीचे काम सुरु झाल्यानंतर सुमारे १२०० शेतकºयांनी मूग, उडीद, सोयाबीन पिकाची नोंदणी केली. नोंदणी पश्चात अद्यापही एकाही शेतकºयाला धान्य खरेदी बाबतचा मोबाईल संदेश मिळाला नाही. तसेच खरेदी केंद्र सुरु झाल्याबाबत कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. मात्र, बाजार आवारात चाललेल्या खरेदीच्या हालचाली पाहून शंका आल्यामुळे शेतकºयांनी आरडाओरड सुरु केली. सदर ठिकाणी मापे सुरु असून शासकीय बारदाण्यात माल भरला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. केंद्र सुरु नसताना कोणाचा माल अगोदरच खरेदी केला जात आहे ही बाब मात्र गुलदस्त्यात होती. कारण येथे कोणत्याही शेतकºयाला माहिती, मोबाईल संदेश, टोकन इत्यादी काहीच प्रक्रिया घडली नाही. मग हा माल आला कोठून असाही प्रश्न उपस्थित झाल्याने शेतकरी संतापले. त्यांनी या सर्व छुप्या खरेदीचा पंचनामा प्रशासनाने करण्याची मागणी केली.शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता महसूल विभाग आणि सहायक निबंधकांच्या संयुक्त पथकाने पंचनामा केला. पंचनाम्यातून अनेक बाबी उघड झाल्या असून, सदर बोगस खरेदी बाबतचा एकही दस्तऐवज या ठिकाणी आढळला नाही. पथकातील अधिकाºयांनी परवानगी बाबतच्या कागदपत्रांची मागणी केली असता सदर कागदपत्रे ही अंबाजोगाई येथील संस्थेच्या कार्यालयात असल्याचे सांगितले. शेतकरी नोंदणी, टोकन इत्यादी कसल्याही प्रकारचे अभिलेखे येथील संस्थेच्या कर्मचाºयाकडे आढळले नाहीत. पंचनाम्यावरुन सर्वच कडधान्य खरेदी ही बोगस असल्याचे सिध्द होत असल्याने हा संपूर्ण माल शासनाने ताब्यात घेण्याची मागणी शेतकºयांनी केली.शासकीय खरेदीसाठी सक्षम नसल्याचे दाखवून केवळ आॅनलाईन नोंदणीचे काम खरेदीविक्री संघाने आपल्याकडे घेतले ते कशासाठी याची उकल आता होत आहे. व्यापाºयांनी सणासुदीच्या काळात शेतकरी अडचणीत असताना कमी भावाने खरेदी केलेला मूग, उडीद, सोयाबीन हा माल सर्वात अगोदर शासनाला खपवून आपले उखळ पांढरे करण्यासाठी हा सर्व प्रताप घडवून आणल्याचे निदर्शनास येत आहे.पणन मंत्र्यांकडे तक्रारशासकीय खरेदी केंद्रावर पदाचा गैरफायदा घेवून शेतकºयांच्या आडून व्यापाºयांना फायदा पोहचविण्यासाठीच्या घडलेल्या प्रकाराची तक्रार पणन मंत्र्यांकडे आ.आर.टी. देशमुख करणार असल्याची माहिती भाजपाचे नितीन नाईकनवरे यांनी दिली.शेतकरी झाले त्रस्त१५ दिवसांपासून नोंद करुन ठेवलेल्या एकाही शेतकºयाचा छटाकभरही माल अजून खरेदी केंद्रावर नाही. त्यात घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा खरेदी केंद्र कधी सुरु होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे खरा शेतकरी अत्यंत त्रस्त झाला आहे. आतातर आॅनलाईन नोंदणी देखील चालू नसल्यामुळे आता माल कोठे विकावा या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
शासकीय खरेदी केंद्रावर पांढरपेशांचा काळा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:39 AM
शेतक-यांना अंधारात ठेवत दोन दिवसांपूर्वीच शासकीय खरेदी सुरु करुन व्यापाºयांचा माल खरेदीसाठी येथील पांढरपेशांनी लढवलेल्या नामी युक्तीचा भांडाफोड १६ नोव्हेंबर रोजी झाला.
ठळक मुद्देदप्तर अंबाजोगाईत, खरेदी माजलगावला : आॅनलाईन नोंदणी फंड्यात व्यापाऱ्यांचा ‘धंदा’