बीड : लाच मागितल्याच्या सर्वाधिक तक्रारी आणि कारवाया या महसूल विभागाच्या असल्याचे एसीबीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. २०१८ ते आजपर्यंत कोतवालापासून ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसारख्या अधिकाºयांच्या मुसक्या एसीबीने आवळल्या आहेत. महसूलनंतर पोलीस विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. दरम्यान, या कारवायांमुळे बीडचा महसूल विभाग लाचखोर असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.सर्वसामान्यांना छोटंस काम करायचे असले तरी अधिकारी, कर्मचारी पैसे मागत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांवरचा विश्वास उडत चालला आहे. हाच धागा पकडून माहिती घेतली असता २०१८ या वर्षात बीड एसीबीने तब्बल २३ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये ३७ आरोपी असून पाच लाख ७२ हजार ३०० रूपयांची रक्कम आहे. तर चालु वर्षात तीन कारवाया झाल्या असून यामध्ये पोलीस हवालदार, आष्टीचा तलाठी आणि शनिवारच्या कारवाईचा समावेश आहे. यामध्ये चार आरोपी आणि पाच लाख १३ हजार रूपयांची रक्कमेचा समावेश आहे.दरम्यान, मागील दोन वर्षांपासून बीड एसीबीच्या कारवायांचा टक्का वाढलेला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी एका आरोपीला शिक्षा लागल्याने विश्वास वाढला आहे.शेळके, खुरपुडेनंतर कांबळे जाळ्यात४गतवर्षात जिल्हा पुरवठा अधिकारी एन. आर. शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे या वर्ग १ च्या दोन तर वर्ग २ च्या तब्बल ८ अधिकाºयांना लाच स्वीकारताना बीड एसीबीने पकडले होते.४आता चालू वर्षाच्या प्रारंभीच महसुलमधील अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळेसारखा बडा ‘मासा’ गळाला लागल्याने खळबळ उडाली आहे.मोठ्या अधिकाºयांवरही कारवाईमोठ्या अधिकाºयांवर कारवाई होत नाही, असा गैरसमज सर्वसामान्य नागरिकांमध्ये होता. मात्र आगोदर जिल्हा पुरवठा अधिकारी शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे आणि आता थेट अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांना बेड्या ठोकल्याने नागरिकांच्या मनातील गैरसमज दुर झाला आहे. मोठ्या अधिकाºयांवरही एसीबी कारवाया करते, हे यावरून स्पष्ट होते. यापेक्षाही या भ्रष्ट अधिकाºयांविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येणाºयांचे एसीबीकडून स्वागत केले जात आहे.
जास्त लाचखोर कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:31 AM
लाच मागितल्याच्या सर्वाधिक तक्रारी आणि कारवाया या महसूल विभागाच्या असल्याचे एसीबीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
ठळक मुद्देकोतवाल ते अप्पर जिल्हाधिकारी : एसीबीच्या कारवायांमुळे प्रकार चव्हाट्यावर