बीड : वाहतूक पोलिसांना न जुमानता सर्रास ट्रीपल सीट वाहने धूमस्टाईलने चालविली जातात. यातून अपघाताचा धोका वाढला आहे. ट्रीपल सीट दुचाकीस्वारांना आवरणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरासह ग्रामीण भागात सर्रास ट्रीपल सीट वाहने चालविली जातात. यामुळे चालकाचा तोल ढळून अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता असते. जिल्हा वाहतूक शाखेने जानेवारी ते ऑगस्ट २०२१ अखेर सुमारे ३ हजार २७३ ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई केली. यातून ६ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाया सुरूच असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी दिली.
...
कितीजणांवर झाली कारवाई
जानेवारी ५४५
फेब्रुवारी ४१२
मार्च ३४५
एप्रिल १९१
मे ८६६
जून ३३९
जुलै २५३
ऑगस्ट ३२२
...
...तर पाचशेचा दंड
विनाहेल्मेट ५०० रुपये
विनापरवाना ५०० रुपये
कर्णकर्कश हॉर्न ५०० रुपये
आदेश न पाळणे ५०० रुपये
बेदरकार वाहन चालविणे ५०० रुपये
धोकादायक वाहतूक ५०० रुपये
....
दुचाकी वाहनचालकांनो, हे नियम पाळा
- महामार्गावरून प्रवास करताना हेल्मेट अवश्य लावा
- लेन सोडून वाहन चालवू नका
- क्रॉसिंग करताना आजूबाजूला पहा व मगच पुढे जा
- दुचाकीला दोन्ही बाजूंना आरसे लावा
- इन्श्युरन्स, वाहन चालविण्याचा परवाना सोबत ठेवा
- सिग्नल तोडू नका
......