...
घंटागाडी येईना, नागरिकांची गैरसोय
अंबाजोगाई : शहरातील भटगल्ली, जैनगल्ली परिसरात येणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा पडून राहत आहे. गाडी नियमित व वेळेवर आल्यास योग्यरीत्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर स्वछता राहील. यासाठी घंटागाडी नियमित, वेळेवर पाठवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पांडे यांनी केली आहे.
...
कोरोना बाधितांचा परिसर निर्जंतुकीकरण करावा
अंबाजोगाई : शहर व परिसरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जे कुटुंब बाधित निघाली त्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी झाली पाहिजे. पूर्वी अशी फवारणी होत होती. मात्र आता होईना. निर्जंतुकीकरण सुरू ठेवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष लोमटे यांनी केली आहे.
...
रस्ता दुरुस्तीची मागणी
अंबाजोगाई : शहरातील रिंगरोड परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम रखडल्याने हा पूर्ण रस्ता नादुरुस्त आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना आपले वाहन चालवताना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. हा रखडलेला रस्ता लवकर दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चितळे यांनी केली आहे.
....
अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन महिन्यात चार वेळा अवकाळी पाऊस झाला. या सतत पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे झाले, मात्र अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यातच आंब्याचे मोठे नुकसान झालेले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.