शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

माणसं मेल्यावर आरोग्य केंद्रात औषधी येणार का? औषधांचा प्रचंड तुटवडा, संतापजनक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 06:03 IST

‘लोकमत’ने औषधांच्या तुटवड्याबाबत वारंवार वास्तव मांडलेले आहे.

>> सोमनाथ खताळ

बीड : ग्रामीण आरोग्य यंत्रणा सध्या औषधांविना आजारी पडली आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. सध्या तर लहान मुलांचे कसलेच औषधी उपलब्ध नाहीत. खोकल्याची एकही बॉटल नाही. जिल्हा नियोजन समितीने चार कोटींचा निधीही दिला; परंतु अद्यापही खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यासाठी आरोग्य विभाग काय मुहूर्त पाहतेय का? तसेच एखादा बळी गेल्यावर औषधी येणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तसेच २९७ उपकेंद्र आहेत. अपवादात्मक वगळता सर्वच आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे; परंतु मागील पाच ते सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील कोणत्याच आरोग्य केंद्र व उपकेंद्रात औषधी नाहीत. जिल्हा नियोजन समितीने ४ कोटी रुपयांचा निधी औषधांसाठी दिला. याची प्रक्रिया साधारण आठ महिन्यांपूर्वी झाली होती; परंतु मुंबईचा नियोजन विभाग व स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने अद्यापही याबाबत काहीच कारवाई झालेली नाही. आरोग्य विभागाकडून केवळ तांत्रिक अडचणी असल्याचे कारण सांगत हात झटकले जात आहेत; परंतु याचा फटका सामान्य रुग्णांना सहन करावा लागत आहे. औषधांविना एखादा बळी गेल्यावर आरोग्य विभाग, प्रशासन आणि शासन औषधी खरेदी करणार आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. औषधी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या औषधींचा तुटवडा

खोकल्याची एकही बॉटल नाही, सर्दी, ताप, खोकला आदींची एकही गोळी नाही. कुत्र्याची लस, ॲसिडीटीची गोळी, तसेच लहान लेकरांसाठी आवश्यक असणारी औषधे व गोळ्या नाहीत. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियासाठी आवश्यक असणारे प्रोमीथीयाझीन, पेन्टाझीशीन हे इंजेक्शनही नाही. तसेच जखम झाली तर पट्टी करण्यासाठी ड्रेसिंग मटेरियलपण नाही.

‘लोकमत’ने मांडले वास्तव

‘लोकमत’ने औषधांच्या तुटवड्याबाबत वारंवार वास्तव मांडलेले आहे. औषधी नसल्याने सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. सरकारी रुग्णालयात केवळ तपासणी केली जात असून, औषधी मात्र खासगी मेडिकलवरून खरेदी करावे लागत आहेत. याचा आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागत आहे. तसेच जखम झाली तर रक्त पुसायला साधा बोळाही नाही, हेदेखील मांडले होते. त्यानंतर प्रशासनाने खडबडून जागे होत तांत्रिक अडचणी दूर करून ४ कोटींचा निधी आरोग्याकडे वितरित केला होता; परंतु आता आरोग्य विभाग खरेदीसाठी कशाचा मुहूर्त पाहत आहे ? याबाबत प्रश्न आहे....

उपकेंद्र २ व आरोग्य केंद्र २ असा चार कोटींचा निधी आहे, हे खरे आहे. खरेदीबाबत जीईएम पोर्टलवर निविदा झाली आहे. पुरवठा आदेश देऊन पंधरवड्यात सर्व औषधी उपलब्ध होतील. सध्या रुग्णकल्याणमधून तात्पुरती सोय केली जात आहे.- डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड

टॅग्स :Beedबीडmedicineऔषधं