शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

आता बोर्डाला काही सांगणार नाही, थेट गुन्हे दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:12 PM

भयमुक्त शांततेत,व ताणवमुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षा देतील याबाबत जिल्हाधिकारी व मी गंभीर आहोत. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार निदर्शनास आल्यास बोर्डाला काही सांगणार नाही, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट गुन्हे दाखल करणार अशी तंबी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

ठळक मुद्दे१५६ केंद्र संचालकांच्या बैठकीत सीईओ कडाडले : सांगितला रेखावार-कुंभार पॅटर्न

बीड : भयमुक्त शांततेत,व ताणवमुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षा देतील याबाबत जिल्हाधिकारी व मी गंभीर आहोत. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार निदर्शनास आल्यास बोर्डाला काही सांगणार नाही, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट गुन्हे दाखल करणार अशी तंबी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.येत्या ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दक्षता समिती व शिक्षण विभागाच्या वतीने गुरूवारी १५६ केंद्र संचालकांची महत्वाची बैठक येथील स्काऊट भवनात झाली. त्यावेळी सीईओ कुंभार बोलत होते.यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी (मा.) नजमा सुलताना, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, गटशिक्षणाधिकारी मिनहाज पटेल, विस्तार अधिकारी नानाभाऊ हजारे, तुकाराम पवार आणि शिक्षण विभागाचे संबंधित कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.रेखावार- कुंभार पॅटर्नपरीक्षा केंद्रावर वर्ग-१ चे अधिकारी, भरारी पथक,बैठे पथक,पोलीस पथक, महसूल पथक तसेच महत्वाच्या पेपरला जिल्हास्तरावरून वर्ग-१ व २ च्या १५६ अधिकाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त केले आहेत. परीक्षा केंद्र परिसरात पालकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. केंद्र संचालक व पर्यवेक्षकांनी ठरवले तर परीक्षा कॉपीमुक्त होऊ शकतात. वर्षानुवर्षे जिल्ह्यातील परीक्षेची चुकीची पद्धत मोडीत काढली जाणार आहे. परीक्षा केंद्रांना मी व जिल्हाधिकारी भेटी देणार असल्याचे सांगत सीईओ अजित कुंभार यांनी ह्यरेखावार- कुंभारह्ण पॅटर्न स्पष्ट केला.प्रामाणिक विद्यार्थ्याला न्याय मिळावाजिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात परीक्षा होतील असे सांगून या परिक्षेकडे केंद्र संचालकांनी व त्यांच्या अधिनस्थ पर्यवेक्षकांनी औपचारिकपणे न पाहता गंभीरपणे पाहावे. प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे.केंद्र संचालक हे परीक्षाकामी सक्षम अधिकारी आहेत. गरज पडल्यास जादा पोलीस बंदोबस्ताची मागणी करावी, अशी सुचना कुंभार यांनी केली.केंद्रावर सर्व भौतिकसुविधा द्या, गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा,एका डेस्कवर एकच विद्यार्थी असावा, परिक्षेसंबंधी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र द्यावे, केंद्रसंचालका व्यतिरिक्त कोणाकडे मोबाईल नसावा. डमी विद्यार्थी असणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सीईओंनी केली.यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव, गौतम चोपडे, शेख जमीर, रवींद्र महामुनी, राऊत, धनंजय शिंदे, धनंजय बोंदरडे, अर्जुन गुंड आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा