गोवर्धनराव सानप पुढे म्हणाले, मुंडे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असून, महाराष्ट्राची शान आहेत. युवकांचे हृदयस्थान असून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक काही मंडळी करीत आहेत. एका स्रीने केलेल्या आरोपात प्रत्यक्षात सिद्ध होण्याच्या अगोदरच केवळ राजकीय लाभ उठवण्याचा उद्देशाने त्यांच्यावर केलेली चिखलफेक ही शुद्ध सूर्यावर थुंकण्यासारखी गोष्ट आहे. ही अत्यंत निंदनीय बाब असून, या सर्व रचित प्रकरणातून मुंडे अलगद बाहेर येतील आणि पुन्हा जनसेवेचा घेतलेला वसा सार्थ ठरवतील, असा जनतेला विश्वास आहे, असे सानप म्हणाले.
आरोप धांदात खोटे : रेखा फड
बीड : धनंजय मुंडे यांच्यावर तथाकथित महिलेने २००६ पासून बलात्कार केल्याचे धांदात खोटे आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे विरोधकांना आयतं कोलित मिळालं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. विरोधकांना मला सांगायचे आहे की ते खोटे असते तर ते व्यक्त झाले नसते. त्यांनी तीन दिवसांपूर्वी काय सत्य आहे ते समाज माध्यमावर उघड केल आहे. २००६ पासून अत्याचार झाला असेल तर त्यांनी त्याचवेळी तत्काळ गुन्हा दाखल का नाही केला? त्यांना तक्रार करायला १५ वर्षं का लागली. इतक्या दिवस त्या काय झोपल्या होत्या का, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा फड यांनी उपस्थित केला? आहे.