माजलगाव : माजलगाव मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाल्यास जनता किमान ५० वर्षे माझी आठवण ठेवील असे काम पाच वर्षांत विश्वासपात्र सालगडी म्हणून करणार असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन भाजप उमेदवार रमेश आडसकर यांनी केले.बुधवारी रमेश आडसकर यांनी तालुक्यातील घळाटवाडी, पवारवाडी, निपाणी टाकळी, हिंगणवाडी या गावात प्रचार दौरा केला. यावेळी या गावांमध्ये आडसकरांचे गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. निपाणी टाकळी गावात तरुणांनी मोटर सायकल रॅली काढली. या प्रसंगी माजी सभापती नितीन नाईकनवरे, माजी तालुकाध्यक्ष अरुण राऊत, हनुमान कदम, अभयराव होके पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना रमेश आडसकरांनी मतदारांशी संवाद साधला. भाजप सरकारची उपलब्धी सांगितली. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी केलेल्या विकासाच्या कामामुळे जनतेत भाजप सरकारबद्दल प्रचंड आस्था आहे. ४० वर्षांपासून खितपत पडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवला. रस्त्याची, राष्ट्रीय महामार्गची भूतो न भविष्यती कामे मतदारसंघात झाल्याचे ते म्हणाले. पंकजा मुंडे यांच्यामुळे गावांतर्गत रस्त्यांची कामे असो किंवा निराधारांच्या वेतनातील वाढ अशा प्रकारची लोकाभिमुख कामे भाजप सरकारने केल्याचे ते म्हणाले.माजलगाव मतदारसंघातील जनतेचा सालगडी म्हणून आपण काम करणार आहोत. कार्य करण्याची संधी दिल्यास २४ तास जनतेसाठी उपलब्ध राहणार आहे. सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी कायम प्रयत्नशील राहून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून कार्य करणार आहे. शेतकऱ्यांची जळालेले रोहित्र त्यांना तात्काळ मिळवून देण्यासंदर्भात प्रामुख्याने काम करण्याची आवश्यकता असून मतदारसंघातील विकासाच्या अनेक धोरणांना तोरण लागण्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी केली.
संधी मिळाल्यास सालगडी म्हणून काम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 11:55 PM
माजलगाव मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाल्यास जनता किमान ५० वर्षे माझी आठवण ठेवील असे काम पाच वर्षांत विश्वासपात्र सालगडी म्हणून करणार असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन भाजप उमेदवार रमेश आडसकर यांनी केले.
ठळक मुद्देरमेश आडसकर : घळाटवाडी, पवारवाडी, निपाणीटाकळी, हिंगणवाडी येथे भेटी