शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

पतीची साथ आणि सासू-सासऱ्यांचा खंबीर पाठिंबा, आरती कुचेकर झाली पोलिस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 2:20 PM

विशेष म्हणजे, आरतीने संसाराची जबाबदारी सांभाळत केले स्वप्न पूर्ण

- धम्मपाल डावरेचिंचाळा (बीड) : जिद्द उराशी बाळगून मेहनत केल्यावर यश हे नक्की मिळतेच, आरती साेमनाथ कुचेकर हिच्या बाबतीतही असे काही झाले. पोलिस होण्याचं स्वप्न उराशी बाळगतानाच संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत मुंबई व ठाणे पोलिस दलात दोनवेळा वेटिंगवर राहिलेल्या आरतीची अखेर बीड पोलिस दलात निवड झाली.

बीड येथील मुरलीधर झाडे यांच्या सामान्य कुटुंबातील आरतीने पोलिस भरतीची तयारी सुरू करत खासगी अकॅडमी जाॅईन केली. पोलिस भरतीचे धडे गिरविताना तिची ओळख याच अकॅडमीतील सोमनाथशी झाली. मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात व लग्नात झाले. आरती आणि सोमनाथ हे तिगाव येथे राहू लागले. गावातच राहून दोघेही पोलिस भरतीची तयारी सुरू केली. पुढच्या भरतीत दोघेही भरतीसाठी उभे राहिले आणि दोघांनाही अपयश आले. त्यानंतर पुन्हा अकॅडमी जॉईन करण्यासाठी दोघे बीड येथे आले. संसाराची जबाबदारी असल्याने सोमनाथ ड्रायव्हिंगचे काम करू लागला तर आरतीनेही पोलिस भरतीची तयारी सुरू केली. त्यानंतर दोन वेळा मुंबई आणि ठाण्यात अपयश आल्यानंतरही न खचता पोलिस भरतीची तयारी सुरूच ठेवली. नुकत्याच झालेल्या भरतीमध्ये आरतीची बीड पोलिस दलात निवड झाली.

दोन वेळेस हुलकावणीमुंबई आणि ठाणे येथील पोलिस भरतीमध्ये दोन वेळा आरतीने वेटिंग लिस्टमध्ये स्थान मिळविले; परंतु नशिबाने हुलकावणी दिली. त्यामुळे तिची निवड होऊ शकली नाही; परंतु यावर्षी आरती ही बीड पोलिस दलात भरतीसाठी उभी राहिली आणि तिची पोलिस शिपाई पदावर निवड झाली.

आरतीला पतीची साथलग्न झाल्यावर स्त्रिया चूल आणि मूल यात अडकून राहतात; परंतु पत्नीला पोलिस बनविण्यासाठी सोमनाथने घेतलेली मेहनत आरतीच्या यशाचे गुपित आहे. तिच्या सासू-सासऱ्यांचेही आरतीला पोलिस व्हावे म्हणून पाठबळ होते.

तिगावची सून झाली पहिली महिला पोलिसवडवणी तालुक्यातील तिगावची सून आरतीची निवड झाल्याबद्दल गावातून मिरवणूक काढून ग्रामस्थांच्या वतीने आणि सरपंच अर्चना राज पाटील यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

कुटुंबीयांचा मोलाचा वाटादोन वेळेस प्रतीक्षायादीत माझे नाव होते; परंतु निवड झाली नाही. त्यामुळे मी न खचता आणखी जोमाने तयारी केली. या वेळेस मला यश मिळाले. माझ्या यशात माझे सासू-सासरे, मोठे दीर, माझे पती व कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी आज पोलिस झाले.- आरती सोमनाथ कुचेकर, नवनियुक्त पोलिस शिपाई, बीड पोलिस दल.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसMPSC examएमपीएससी परीक्षा