शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

चार दिवसातच झाली सहायक पोलीस निरीक्षकाची बदली...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 12:06 AM

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार याची बदली होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत होती. त्यांच्या जागेवर उस्मानाबाद येथील पोलीस अधीक्षक ए. राजा हे येणार असे बोलले जात होते. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर पूर्वी बीड जिल्ह्यात कर्तव्यावर असणारे व नंतर उस्मानाबाद येथे बदलून गेलेले तसेच चार दिवसांपूर्वी पुन्हा बीड येथे आलेले सपोनि मुंडे यांची अवघ्या चार दिवसात पुन्हा उस्मानाबादला बदली करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविशेष पोलीस महानिरीक्षकांनी काढले बदलीचे आदेश : तात्काळ केले कार्यमुक्त

बीड : पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार याची बदली होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत होती. त्यांच्या जागेवर उस्मानाबाद येथील पोलीस अधीक्षक ए. राजा हे येणार असे बोलले जात होते. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर पूर्वी बीड जिल्ह्यात कर्तव्यावर असणारे व नंतर उस्मानाबाद येथे बदलून गेलेले तसेच चार दिवसांपूर्वी पुन्हा बीड येथे आलेले सपोनि मुंडे यांची अवघ्या चार दिवसात पुन्हा उस्मानाबादला बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे यांनी बीड येथे आल्यानंतर नेमके काय केले की त्यामुळे त्यांची परत बदली करण्यात आली, या चर्चेला उधाण आले आहे.उस्मानाबाद येथून चार दिवसांपूर्वी बदली होऊन सपोनि गणेश मुंडे हे बीड येथे आले होते. दरम्यान ते बीड येथे आल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली होणार असून, त्यांच्या जागेवर ए. राजा येणार असल्याची चार्चा दबक्या आवाजात पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या वर्तुळात सुरु झाली होती. मात्र, चार दिवसांतच औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी मुंडे यांच्या बदलीचे आदेश काढून पुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यात बदली केली आहे. दरम्यान त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात आले आहे. मुंडे हे यापूर्वी देखील बीड जिल्ह्यात कार्यरत होते आणि त्याकाळात त्यांची कारकीर्द काही प्रमाणात वादग्रस्त देखील ठरली होती. त्यांना ठाणेप्रमुख पदावरून मुख्यालयावर नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान मुंडे यांची पुन्हा बदली झाल्यामुळे उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची नियुक्ती बीड येथे होण्याची शक्यता नाही.गणेश मुंडे हे ए.राजा यांचे निकटवर्तीयमागच्या काही दिवसांपासून बीडच्या पोलीस अधीक्षकपदी ए. राजा येणार असल्याच्या चर्चा पोलीस दलात सुरु होती. ए. राजा उस्मानाबादला असताना त्यांच्यासोबत काम केलेल्या आणि त्यांचे निकटवर्तीय असल्याची सूत्रांची माहिती आहे. याच दरम्यान सपोनि मुंडे यांची बदली बीडला झाल्याने ए. राजा हे बीडला येणार असल्याचे निश्चित मानले जात होते. मात्र, ए.राजा यांची बीडला बदली व्हावी याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोध होता अशी देखील सूत्रांची माहिती आहे. तसेच काही लोकप्रतिनिधींनी देखील राजा यांच्या नावाला विरोध केला होता.हर्ष पोद्दार यांच्या बदलीला नागरिकांमधून विरोधपोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बीड पोलीस अधीक्षकपदी नियुक्त झाल्यापासून त्यांनी बीड पोलीस दलात अमुलाग्र बदल केले आहेत. तसेच पोलीस दलातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी विविध प्रयोग त्यांनी राबवले, गुन्हे उघडकीस यावेत, गुन्हेगाराविरुद्ध सबळ पुरावे गोळा करुन त्याला शिक्षा कशी होईल या दृष्टीने कृतिशील कार्यक्रम राबवला व संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या. निवडणूका, अयोध्या येथील जागेचा निकाल व इतर काही कठीण प्रसंगात बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य नियोजन केले. त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष अधिकाºयाची बीड जिल्ह्याला आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्याचा उद्देश नेमका कोणाचा आहे याविषयी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसTransferबदली