शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

साडेतीन वर्षात पोलिसांकडे आरटीआयचे ७६८ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:14 AM

बीड : तक्रारी व पोलीस विभागाशी संबंधित माहिती मागविण्यासाठी साडेतीन वर्षात तब्बल ७६८ अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यांची माहिती पुरविण्यात पोलिसांना यशही आले आहे. दरम्यान, माहिती अधिकारात सर्वाधिक माहिती ही वैयक्तिक तक्रारींची मागविल्याचे सूत्रांकडून समजते.माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार सर्वसामान्य नागरिक कोणतीही माहिती मागवू शकतो. त्यानुसार जिल्हा पोलीस ...

बीड : तक्रारी व पोलीस विभागाशी संबंधित माहिती मागविण्यासाठी साडेतीन वर्षात तब्बल ७६८ अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यांची माहिती पुरविण्यात पोलिसांना यशही आले आहे. दरम्यान, माहिती अधिकारात सर्वाधिक माहिती ही वैयक्तिक तक्रारींची मागविल्याचे सूत्रांकडून समजते.

माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार सर्वसामान्य नागरिक कोणतीही माहिती मागवू शकतो. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रशासनाकडे आतापर्यंत ७६८ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज येताच गृह विभागाकडून संबंधित पोलीस ठाण्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ कलम - ६ (३) (२) अन्वये तो वर्ग केला जातो.

त्याप्रमाणे ठाणे प्रमुख किंवा उप विभागीय पोलीस अधिकारी त्यावर पुढील कार्यवाही करतात. अर्जाची पूर्तता करावी व संबंधिताला कळवावे, असेही पत्रात नमूद असते. शिवाय अर्जदारालाही एक प्रत पाठवून संबंधितांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते.आॅनलाईन अर्जांची संख्याही वाढलीजानेवारी ते जून २०१८ अखेरपर्यंत २७ आॅनलाईन अर्ज गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत. तसेच दोन आॅफलाईन अपीलही प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.असे चालते कामगृह विभागात पोलीस उप अधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे.संदीप गिराम, जी. बी. सूर्यवंशी हे कर्मचारी येथे कार्यरत आहेत.पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्याकडूनही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.ठाणेप्रमुखच जन माहिती अधिकारी१ जुलै २०१७ पासून प्रत्येक ठाण्याचे, शाखेचे प्रमुख हे जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच त्या त्या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी आहेत. कामात सुसूत्रता आल्याने नागरिकांना वेळेत परिपूर्ण माहिती मिळत असल्याचे गृह विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडRight to Information actमाहिती अधिकारMarathwadaमराठवाडा