शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

बीडमध्ये अवैध गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू; पोलिसांनी पतीसह नातेवाईकांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 1:28 PM

मयत महिलेच्या गर्भपिशवीला छिद्र पडलेले होते, तसेच आत अर्भक नव्हते.

- सोमनाथ खताळबीड : अगोदरच स्त्रीभ्रूण हत्येने बदनाम झालेला बीड जिल्हा पुन्हा एकदा अशाच कारणाने चर्चेत आला आहे. पहिल्या तीन मुली असलेल्या महिलेचा चौथ्यांदा गर्भ राहिल्याने रविवारी मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता, हा मृत्यू गर्भपातामुळेच झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात गर्भलिंग निदान करून गर्भपात झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पोलिसांनी पतीसह इतर नातेवाइकांना ताब्यात घेतले आहे.

सीताबाई उर्फ शीतल गणेश गाडे (वय ३०, रा. बक्करवाडी, ता. बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. शीतल या ऊसतोड मजूर असून, त्यांना अगोदरच ९, ६, आणि ३ वर्षांच्या तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. परंतु, रविवारी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून शवविच्छेदन करण्यात आले. याचा अहवाल प्राप्त झाला असून, हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

काय आढळले होते अहवालात?मयत महिलेच्या गर्भपिशवीला छिद्र पडलेले होते, तसेच आत अर्भक नव्हते. महिलेचा गर्भ १८ आठवड्यांचा होता. गर्भाशी छेडछाड झाल्याने पोटातच दीड लिटर रक्तस्त्राव व बाहेर अंदाजे पाच लिटर रक्त गेले होते. रक्ताने कपडे भिजलेले होते. शस्त्रक्रियागृहातील टेबलवर रुग्णाचे कपडे, अंग खराब होऊ नये म्हणून पॉलिथिन शीट टाकले जाते. त्याचे तुकडे महिलेच्या पाठीला चिटकलेले होते. या व इतर काही महत्त्वाच्या वैद्यकीय मुद्द्यांवरून हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले. तसेच नातेवाईकांनीही बोलण्यास नकार दिल्याने यात संशय आणखीनच बळावला आहे.

सुदाम मुंडे मुळे अगोदरच बदनामीजिल्हा अगोदरच सुदाम मुंडे सारख्या नराधमामुळे बदनाम झाला होता. स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणात त्याला शिक्षाही झाली होती. त्यानंतर राज्यात सर्वत्र पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यामुळे गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात असे प्रकार थांबले होते. परंतु, रविवारच्या घटनेने पुन्हा एकदा जिल्हा बदनाम झाला आहे.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीpregnant womanगर्भवती महिला