सुंदरराव सहकारी साखर कारखाना येथे कॉड्रिपलमेंट विभागात कार्यरत असलेले रुस्तुम बापूराव तौर(वय ४२ वर्षे, राहणार रिधोरी) हे तेलगाववरून आपली मोटरसायकल(एम एस ४४ डब्ल्यू १९४५)ने माजलगाव शहराकडे येत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शांताबाई रुस्तुम तौर (वय ३८ वर्षे) व ५ वर्षांची नात होती. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरून नित्रुड पार करत असताना पाठीमागून वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परने जोराची धडक दिली. या अपघातात शांताबाई रुस्तुम तौर जागीच ठार झाल्या, पती रुस्तुम तौर गंभीर जखमी झाले आहेत. तर पाच वर्षांच्या नातीला किरकोळ मार लागला.
दरम्यान, अपघात करून हायवा वाळूटिप्पर पळून जात असल्याची माहिती दिंद्रुड पोलिसांना मिळाली. यावेळी पो.ना. बालाजी सूर्यवाड, पो.ना.अनिल भालेराव, चालक पोलीस कर्मचारी शेख युनूस यांनी हायवाचा पाठलाग करून लऊळजवळ नागरिकांच्या मदतीने त्यास पकडले. दरम्यान टिप्पर चालकाविरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित चालक फरार झाला.
===Photopath===
280421\purusttam karva_img-20210428-wa0026_14.jpg