धारुर तालुक्यातील पहाडी दहिफळ येथील रेखाबाई लालासाहेब धाईतिडक यांनी चोंडी येथील मुद्रिका उर्फ गोबा सुधाकर धाईतिडक यांना कारखान्यावर ऊसतोड मजूर पुरवण्यासाठी म्हणून पैसे दिले होते, परंतु त्यांनी ऊसतोड मजूर पुरविले नाहीत. म्हणून त्यांना दिलेले पैसे परत मागण्यासाठी रेखाबाई चोंडी येथे गेल्या. आम्हाला पैशाची अडचण आहे. दिलेले पैसे परत द्या, असे म्हणताच, तुझे कशाचे पैसे, असे म्हणून रेखाबाईला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. दादासाहेब मधुकर मुंडे यांनी त्यांच्या हातातील दगड रेखाबाईच्या डोक्यात मारून जखमी केले. मुद्रिका उर्फ गोबा सुधाकर धाईतिडक व करण मधुकर मुंडे यांनी त्यांच्या हातातील काठीने रेखाबाईची मुलगी रेवतीच्या पाठीत मुका मार दिला व मुलगा जयद्रथला काठीने मारून त्याचे डोके फोडले. सुधाकर धाईतिडक यानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद रेखाबाई लालासाहेब धाईतिडक यांनी धारूरा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार, मुद्रिका सुधाकर धाईतिडक, दादासाहेब मधुकर मुंडे, करण मधुकर मुंडे व सुधाकर वामन धाईतिडक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ए.जी.पठाण हे करत आहेत.
मजूर पुरविण्यासाठी दिलेले पैसे मागितल्याने महिलेचे डोके फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:33 AM