अंबाजोगाई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामाजवळ अवंतीपुरा या ठिकाणी सैन्याच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध अंबाजोगाईत नोंदविण्यात आला. अंबाजोगाई शहरातील महिलांनी शहरातून निषेध मोर्चा काढला.सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी १० वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृहापासून महिलांचा निषेध मोर्चा निघाला. हा मोर्चा सावरकर चौक, शिवाजी चौक, गुरुवारपेठ, पाटील चौक, तहसील कार्यालयामार्गे सभागृहात पोहचला. यावेळी मोर्चाचे विसर्जन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून व राष्ट्रगीताने झाले. या मोर्चात मिल्लिया उर्दू कन्या शाळा, गोदावरीबाई कुंकुलोळ कन्या विद्यालय, वेणूताई चव्हाण कन्या विद्यालय, वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, मुकुंदराज विद्यालय, योगेश्वरी महाविद्यालय, जिल्हा परिषद कन्या शाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय व टी.बी. गिरवलवकर, इनरव्हील क्लब, माहेश्वरी महिला मंडळ, विविध महिला भजनी मंडळ या मोर्चात सहभागी झाले होते.
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:13 AM