लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील विभागीय कार्यालयातील एका महिला लिपिकला बाहेरून आलेल्या महिला पोलीस कर्मचा-याने मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेला पंधरा दिवस उलटल्यानंतरही एसटीच्या अधिका-यांनी काहीच कारवाई केलेली नाही. कारण कोणतेही असले तरी एसटीच्या परिसरात ही घटना घडल्याने कर्मचा-यांची सुरक्षिततेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या या प्रकरणाची जोरात चर्चा सुरू आहे. विभागीय नियंत्रक मात्र या गंभीर घटनेबद्दल अद्यापही अनभिज्ञच असल्याचे समजते.
बसस्थानक परिसरात राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय आहे. येथे काम करणाºया अधिकारी, कर्मचाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा विभागही आहे. परंतु हा सुरक्षा विभाग केवळ नावालाच आहे. आओ जाओ, घर तुम्हारा, अशी परिस्थिती या कार्यालयातील आहे. असाच प्रकार २२ जानेवारी रोजी घडला. एका महिला पोलीस कर्मचाºयाने तावातावात थेट कार्यालयाचा तिसरा मजला गाठला.
येथील एका महिला कर्मचाºयासोबत बाचाबाची झाली. त्या दोघीही वाद घालत खाली आल्या. शाब्दीक चकमकीचे रूपांतर हाणामरीत झाले. प्रवेशद्वारावरच सुरक्षा रक्षकांसह एसटीच्या कर्मचाºयांसमोर दोन्ही महिलांमध्ये ‘फ्री स्टाईल’ झाली. अद्याप या प्रकरणाची कोठेही नोंद झाली नसली तरी कार्यालयात मात्र हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेतरा.प.म. कार्यालयातील कर्मचाºयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कार्यालयात व सर्व बसस्थानकात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.
कर्मचा-यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरबाहेरून येत एसटीच्या कॅम्पसमध्ये एका महिला कर्मचाºयाला सर्वांसमोर मारहाण झाल्याने येथील कर्मचाºयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था अशावेळी कोठे असते आणि काय करते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरक्षा अधिका-यांकडून दुजोरायाबाबत सुरक्षा अधिकारी सानप म्हणाले, दोन महिलांमध्ये मारहाण झाल्याचे समजले आहे. परंतु आमच्याकडे तक्रार आली नाही. सदरील महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे समजले आहे. हा वाद घरगुती कारणावरून झाल्याचे कानावर आले असून याबाबत विभागीय नियंत्रकांना कळविल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कॅम्पसमध्ये बाहेरच्या व्यक्तीने येऊन एसटीच्या कर्मचाºयाला मारहाण करणे हे गंभीर आहे. अशा घटनेमुळे कर्मचारी दहशतीखाली आहेत.
जगतकर म्हणाले, मला माहिती नाही...विभागीय नियंत्रक जी.एम. जगतकर यांना विचारले असता, असा प्रकार मी तुमच्याकडूनच ऐकत आहे. मला याबद्दल अद्याप काहीच माहिती नाही. माहिती घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. यावरून एका जबाबदार अधिकाºयालाच एवढ्या गंभीर घटनेची माहिती नसणे, म्हणजे संतापजनक असल्याचे बोलले जात आहे.