लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील सावतामाळी चौकातील एका शिक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करीत चोरट्यांनी हजारोंचा ऐवज लंपास केला. तर जवाहर कॉलनीत चक्क महिला पोलीस कर्मचा-याच्या घरीच चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती समजताच ठसे तज्ज्ञ, श्वान पथक व वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याच्या तपासासाठी विशेष पथकेही नियुक्त केली आहेत.
सध्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी जयश्री नरवडे यांनी नगर रोडलगत असलेल्या जवाहर कॉलनीत नवीन घर घेतले आहे. घराची पूजा करून त्या काही दिवसात कायमस्वरूपी राहण्यासाठी जाणार होत्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व साहित्य नवीन घरात ठेवले होते. परंतु केवळ पुजा झालेली नसल्यामुळे त्यांनी गृहप्रवेश केला नव्हता.बुधवारी दिवसभर साहित्य व किंमती मुद्देमाल त्यांनी नवीन घरात ठेवला होता. आणि त्या जुन्या घरी गेल्या. रात्रीच्या सुमारास दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरांनी घरात प्रवेश करीत कपाटातील सोन्याचे गंठन, रोख ६७ हजार रुपये व २२ इंच टीव्ही लंपास केला.
ही घटना गुरुवारी सकाळी नरवडे घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक चोरीचा तपास करीत आहे.
दुसरी घटना सावतामाळी चौकात भगवानदादा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेले कैलास एकनाथराव लगड या शिक्षकाच्या घरी झाली. रात्री जेवण करून ते झोपले. रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा तोडून घरात प्रवेश केला. धस्त्राचा धाक दाखवून त्यांनी मुद्देमालाची माहिती घेतली. आरडाओरडा करण्यापूर्वी चोरांनी लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याप्रमाणे चोरांनी लगड यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. घनश्याम पाळवदे, स. पो. नि. दिलीप तेजनकर, सचिन पुंडगे हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले. मिळालेल्या पुराव्याआधारे त्यांनी तपासाला सुरुवात केली होती. पो. उप नि. बिराजदार हे त्यांना घटनेची माहिती देत होते.
दागिने दे, नाहीतर मारून टाकू, शिक्षकाला धमकीलगड यांचा मुलगा बेडरूममध्ये होता तर लगड दाम्पत्या वेगळ्या रूममध्ये होते. याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या रूममध्ये प्रवेश केला. आगोदर लगड यांना धारदार शस्त्राचा धाक दाखविला, परंतु त्यांनी काहीच माहिती दिली नाही. आरडाओरडा झाल्याने त्यांची पत्नी उठली. तिलाही धमकी देऊन कपाट व इतर ठिकाणच्या मुद्देमालाची माहिती घेतली. परंतु कपाटात काहीच न मिळाल्याने बुरखाधारी चोरट्याने लगड यांना रागाने लोखंडी रॉडने पायावर मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.