जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाकडून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेतले जातात. यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, तसेच ग्रामीण व शहरी भागात जनजागृतीही केली जाते. याचा काही प्रमाणात फायदा होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. २०१५-१६ साली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे ८९८ एवढा होता. आता तो वाढून ९४६ वर पोहोचला आहे. ही आकडेवारी समाधानकारक असली तरी मुलांची बरोबरी करण्यासाठी सर्वांनाच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. नागरिकांनीही मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
--
लिंगनिदान केल्यास कारवाई
काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा स्त्री भ्रूण हत्येमुळे बदनाम झाला होता. त्यानंतर पीसीपीएनडीटी कायदा लागू केला. लिंगनिदान करणाऱ्यांसह करून घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. तेव्हापासून आतापर्यंत तरी एकही कारवाई झालेली नाही. लिंगनिदान बंद झाल्यानेच जन्मदर ८९८ वरून ९४६ वर पोहोचला आहे.
---
मुलगा आणि मुलगी दुजाभाव करू नका, याबाबत जनजागृती केली जाते. जन्मदर बरोबर करण्यासाठी आमच्याकडून पूर्ण प्रयत्न सुरूच आहेत, तसेच लिंगनिदान करणाऱ्यांसाठीही शासनाने कडक नियम केलेले आहेत. त्याचाही फायदा होत आहे. नागरिकांनीही मनातील गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.
डॉ.रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.
--
१) हजार मुलांमागे मुली किती?
२०१५- १६ : ८९८
२०१६-१७ : ९२७
२०१७-१८ : ९३६
२०१८-१९ : ९६१
२०१९-२० : ९४७
२०२०-२१ : ९२८
२०२१ (ऑगस्टपर्यंत) - ९४६
२) मुला-मुलींच्या जन्माची संख्या
२०१५- १६ : ४२६८१
२०१६-१७ : ४५०६४
२०१७-१८ : ४७२९७
२०१८-१९ : ४६७८९
२०१९-२० : ४६०३७
२०२०-२१ : ४५६८४
२०२१ (ऑगस्टपर्यंत) - १७४६३
210921\21_2_bed_7_21092021_14.jpeg
डॉ.रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड