शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

ढगाळ वातावरणामुळे उसावर लोकरी माव्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 12:09 AM

गेवराई : तालुक्यात नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात उसावर लोकरी मावा या किडीचा प्रादुर्भाव ढगाळ हवामान थंड हवा, १९ ...

ठळक मुद्देकीडग्रस्त ऊस बेण्यासाठी न वापरण्याचे आवाहन; रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याचे आवाहन

गेवराई : तालुक्यात नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात उसावर लोकरी मावा या किडीचा प्रादुर्भाव ढगाळ हवामान थंड हवा, १९ ते ३५ सेल्सिअस तापमान, ८० ते ९५ टक्के सापेक्ष आर्द्रता अशा वेळी होतो आणि सध्या उसावर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नियंत्रणाचे उपाय कीडग्रस्त भागात उसाची पट्टा अथवा रु ंद सरी पद्धतीने लागवड करावी. त्यामुळे प्रादुर्भावानंतर नियंत्रणाचे उपाययोजने सोयीचे होईल.कीडग्रस्त ऊस बेण्यासाठी वापरू नये बेणे निवडून झाल्यानंतर उसाची पाने जाळून टाकावीत. रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा नत्रयुक्त खताचा वापर जास्त केल्यास किडीच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. मावाग्रस्त उसाची हिरवी अथवा कोरडी पाने एका शेतातून दुसऱ्या शेतात अथवा एका भागातून दुसºया भागात घेऊन जाऊ नये. प्रादुर्भाव जास्त झाल्यास कीड नियंत्रण त्वरीत होत नाही.रासायनिक उपाय सहा महिन्यांपर्यंत उसाला फोरेट १० जी दाणेदार १५ किलो प्रति हेक्टर तर सहा ते नऊ महिन्यापर्यंत उसाला २० किलो प्रती हेक्टर शेतामध्ये सम प्रमाणात पसरविणे. पहिल्या फवारणीनंतर एका महिन्याने किंवा जास्तीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायमिथोइट ३० टक्के प्रवाही क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही ६०० ते १५०० मिली लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मोठ्या उसात गटूर किंवा पावर पंप वापरून फवारणी करताना कीटकनाशकांचे द्रावण जास्त दाबाने फवारल्यास कीड त्वरित मरते. पावर पंपाने फवारणी करताना पाणी कमी वापरावे. द्रावणास चिकटपणा येण्यासाठी स्टिकर १ मिली प्रति लिटर पाणी मिळवावे, असे आवाहन विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र खामगाव डॉ. भैय्यासाहेब गायकवाड यांनी केले आहे. ऊस पिकावर अशाप्रकारे कीड आढळून आल्यास कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.मित्रकीटक उसात सोडावेतजैविक पद्धत या किडीच्या नियंत्रणासाठी क्रायसोपरला कारनिया हा परभक्षक मित्रकिटक मऊ शरीराच्या किडीवर उपजीविका करतो. क्रायसोपरला कारनिया किटकाची एकरी २५०० अंडी किंवा अळ्या सोडाव्यात. उसात किडींचा खूप प्रादुर्भाव असल्यास अगोदर कीटकनाशकांच्या साह्याने किडीची संख्या कमी करावी व त्यानंतर १५ दिवसांनी परभक्षी कीटक सोडावेत. परभक्षी किटकांच्या अळ्या किडीस नष्ट करतात आणि प्रादुर्भावग्रस्त उसात फक्त परभक्षक सोडल्यास कीड नियंत्रण त्वरित होते. किडीचा प्रादुर्भाव झाल्यास लवकरात लवकर परभक्षक सोडाव्यात, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना केले जात आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र