विजेचा लपंडाव
अंबाजोगाई : शहर व परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. अचानक खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने विजेवर आधारित व्यावसायिकांवर परिणाम होऊ लागला आहे. वीज सुरळीत पुरवावी, अशी मागणी होत आहे.
गतिरोधकाची दुर्दशा
बीड : शहरातील मुख्य भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले गतिरोधक दुरुस्तीला आले आहेत. गतिरोधक खराब झाल्याने गतीला आवरणे कठीण झाले आहे. यामुळे शहरात नव्याने गतिरोधक तयार करण्याची मागणी वाहनधारक, नागरिकांतून होत आहे.
अवैध दारू विक्री सुरू
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी महिलांनी केली आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पर्यावरण धोक्यात
अंबाजोगाई : शहर परिसरात वीटभट्ट्या आहेत. परवानगी नसतानाही भट्ट्या सुरू आहेत. प्रदूषण निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
आदर्शनगरातील रस्त्याची दुरुस्ती
बीड : शहरातील आदर्शनगरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. पावसाचे पाणी साचून खड्ड्यांचा आकार वाढत होता. त्यामुळे पादचारी, वाहनचालक त्रस्त होते.