शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा चर्चा फेल! लाइव्ह स्ट्रीमिंगवर डॉक्टर ठाम; ममता म्हणाल्या, आपण अशा पद्दतीने माझा अपमान करू शकत नाही
2
"राजीव गांधी एका मुलाखतीत आरक्षण मिळणाऱ्यांना 'बुद्धू' म्हणाले होते अन्..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर प्रहार
3
धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे २४ उपजिल्हाधिकारी ‘IAS’ पदोन्नतीच्या तयारीत
4
"नेहरू म्हणाले होते, आरक्षणवाल्यांनी नोकरी मिळवली, तर सरकारी सेवांची क्वालिटी...!"; PM मोदींचा मोठा दावा
5
धक्कादायक! आर्या जाधवला बिग बॉसने बाहेर काढलं, निक्कीवर हात उगारल्याने मिळाली मोठी शिक्षा
6
शिंदे गटाच्या दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी, केलं होतं असं कृत्य
7
सरकारचे निवडणुकीचे गणित सर्वसामान्यांना महागात पडणार, कांदा 100 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता
8
“२०१७ मध्येच फडणवीसांनी सगेसोयरे कायदा केला, पण मराठा मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवला नाही”
9
"काँग्रेसच्या राज्यात गणतपतीजींनाच तुरुंगात टाकले जातेय, विघ्नहर्त्याच्या पूजेतही..."; PM मोदींचा हल्लाबोल
10
“होय, रात्री २.३० वाजता मनोज जरांगेंना भेटलो”; रोहित पवारांची कबुली, भुजबळांना दिले आव्हान
11
विनेश फोगाटचे आरोप हरिश साळवेंनी खोडले; काय घडले ते सांगितले, मोठा खुलासा करत म्हणाले...
12
"माझा राग देवेंद्रजींवर, कारण...", अखेर एकनाथ खडसेंनी सांगितला नेमका वाद काय?
13
भाजप आमदाराचा मोठा निर्णय, विधानसभा लढवण्यास नकार; धनंजय मुंडेंकडे बोट
14
पावसाच्या पाण्यात कार घालताय? एचडीएफसीच्या मॅनेजर, कॅशिअरचा बुडून मृत्यू
15
"भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही..." PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात
16
“संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाडा लागला”; शिंदे गटातील नेत्याने केला खळबळजनक दावा
17
Gold price : स्वस्त झाले की महागले, आठवडाभरानंतर 10 ग्रॅम सोन्याचे दर किती?
18
दररोज रिकाम्या असतात शेकडो सिट्स, या ट्रेनमुळे रेल्वेला होतोय कोट्यवधीचा तोटा
19
"कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गरीब मराठ्यांचे"; गॅझेट अंमलबजावणीवर जरांगे म्हणाले...
20
“नाथाभाऊंबाबत केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे मान्य, गणपतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल”: फडणवीस

बीड शहरातील नव्या पुलाचे काम आजपासूनच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:46 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शहरातील बिंदूसरा नदीवरील पुलाचे काम तातडीने शुक्रवार (दि. १५) पासून सुरु होणार आहे. गुरुवारी ...

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागरांची नॅशनल हायवेच्या अधिका-यांबरोबर बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील बिंदूसरा नदीवरील पुलाचे काम तातडीने शुक्रवार (दि. १५) पासून सुरु होणार आहे. गुरुवारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी एस.चंद्रशेखर, आय.आर.बी.चे वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिकाºयांची तातडीने नागपूर येथे बैठक घेतली. आय.आर.बी. करत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग २११ च्या कामांतर्गत स्कोप आॅफ चेंज वर्क या हेडखाली हे काम होणार आहे. अस्तित्वात असलेला पूल पाडण्याचे काम १५ ते २० दिवसात करुन पावसाळयापूर्वीच नव्या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आ. क्षीरसागरांनी दिल्यामुळे या पुलाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वरील बीड बायपास १२ किलोमीटरला सर्व्हिस व स्लीप रोड करुन परळी - बीड - नगर रस्त्यावर पांगरबावडी, इमामपूर या ठिकाणी भुयारी पूल व रस्ता करण्याचा निर्णय झाला आहे. कुर्ला रोडवरील नागरिकांसाठी सर्व्हिस व स्लीपरोड करण्याची सूचनाही आ. क्षीरसागर यांनी प्रकल्प संचालकांना दिली होती. त्याच वेळी बार्शी नाका येथील बिंदूसरा नदीवरील ८० वर्षांपूर्वीचा पूल त्याच ठिकाणी १६२ मीटर लांबीचा नवीन पूल करण्याचा प्रस्ताव २०१६ मध्येच दाखल केला होता.

केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा पूल स्कोप आॅफ चेंज वर्क या नियमानुसार नवीन टेंडर न काढता कमी कालावधीत करता येतो हे आ. क्षीरसागर यांनी निदर्शनास आणून दिले होते.

त्यानंतर गडकरी यांनी पुलाच्या बांधकामाबाबत सूचना देऊन तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य संचालक एस.चंद्रशेखर आणि प्रकल्प संचालक चामलगोरे, घोटकर, आय.आर.बी.कंपनीचे प्रकल्प संचालक आर.एन.चौरे, धनराज केपरीट, कार्यकारी अभियंता दंडे राष्ट्रीय महामार्ग यांच्याबरोबर बैठका घेऊन पुलाच्या कामाला गती देण्यात आली.अधिका-यांच्या बैठकांवर बैठकाकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत अधिकाºयांच्या साधारण ६ ते ७ बैठका घेत अखेर या पुलाचा प्रश्न मार्गी लावला आहे, आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. शुक्रवारपासून मुख्य संचालक एस. चंद्रशेखर व अधिकाºयांच्या उपस्थितीत जुना पूल पाडण्याचे काम सुरू होणार आहे.