बीड पालिकेतील कर्मचाऱ्यांना कालबद्ध १२ वर्षे सेवेबाबत व आश्वासित प्रगती योजना २४ वर्षे सेवेबाबत पदोन्नती लागू करणे आवश्यक आहे. याबाबत शासन निर्णय असतानाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. एवढेच नव्हे तर ५ नोव्हेंबर २०१८ रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावही झाला आहे. परंतु, अद्याप या कर्मचाऱ्यांना या योजनांचा लाभ मिळालेला नाही. यापूर्वी अनेकदा उपोषण केल्यावर केवळ कारवाईचे अश्वासन दिले जात असून प्रत्यक्षात काहीच निर्णय घेतला जात नसल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. प्रशासन कामगार, कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असून पदोन्नतीबाबत योग्य निर्णय घेऊन हा अन्याय दूर करावा, अशी मागणी संघटनेने निवेदनात केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल मोटे, स. फेरोज स. शोएब, गोरख साळवे, नरेंद्र वडमारे, कचरू कांबळे, पप्पू साळवे आदींची उपस्थिती होती.
बीड पालिकेतील कामगार, कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:51 AM