जिल्ह्यात शनिवारी ३ हजार ९७१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २ हजार ७६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १ हजार २१० नवे रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात २३४, आष्टी तालुक्यात १६५, बीड तालुक्यात २२७, धारूर तालुक्यात ४९, गेवराई तालुक्यात ८७, केज तालुक्यात १२९, माजलगाव तालुक्यात ५७, परळी तालुक्यात १०७, पाटोदा तालुक्यात ८८, शिरूर तालुक्यात ३१, वडवणी तालुक्यात ३६, नवे रुग्ण आढळून आले आहेत,
तसेच २१ ते २३ एप्रिलदरम्यान झालेले २८ कोरोना मृत्यू आरोग्य विभागाच्या पोर्टलवर शुक्रवारी नोंदवले गेले. यात, परळी शहरातील ६५ वर्षीय पुरुष, बीड शहरातील ३८ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई तालुक्यातील कांदेवाली येथील ६६ वर्षीय पुरुष, गिरवली येथील ७२ वर्षीय पुरुष, बीड शहरातील ६८ वर्षीय पुरुष, धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील २३ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील ५१ वर्षीय पुरुष, सेलूअंबा येथील ५६ वर्षीय महिला, सोनवळा येथील ८३ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील ७० वर्षीय पुरुष, गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील ४५ वर्षीय महिला, माजलगाव येथील ५५ वर्षीय महिला, पाटोदा तालुक्यातील चुंभळी येथील ६५ वर्षीय पुरुष, पाली येथील ६४ वर्षीय पुरुष, परळी येथील ६३ वर्षीय पुरुष, काकडहिरा येथील ७० वर्षीय पुरुष, धारूरच्या पळसखेडा येथील ७३ वर्षीय महिला, अंबाजोगाई येथील ६५ वर्षीय पुरुष, कांदेवाली येथील ६५ वर्षीय महिला, केज तालुक्यातील जवळबन येथील ७० वर्षीय पुरुष, अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री येथील ३२ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील ७५ वर्षीय पुरुष, माजलगावच्या नित्रूड येथील ५० वर्षीय महिला, तालखेड येथील ६५ वर्षीय महिला, बीडच्या बाकरवाडी येथील ६५ वर्षीय महिला, देवपिंपरी येथील ५० वर्षीय महिला, रोहतवाडी येथील ६५ वर्षीय महिला, परळीच्या तळेगाव येथील ६० वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.