बीड : मंगळवारपासून सुरू होणा-या बारावीच्या परीक्षा आयोजनाची पूर्वतयारी पुर्ण झाली असून, ९७ केंद्रांवर ४० हजार ६५१ विद्यार्थीपरीक्षा देणार आहेत. तर ३ मार्चपासून सुरू होणाºया दहावीच्या परीक्षेसाठी ४६ हजार ५३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा तणावमुक्त आणि कॉपीमुक्त होण्यासाठी पोलीस विभागाने कठोर उपाययोजना करण्यासह शिक्षण विभागाने परीक्षा व्यवस्थेबाबत काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.परीक्षेबाबत जिल्हा दक्षता समितीची नुकतीच बैठक झाली. त्यावेळी त्यांनी समिती सदस्यांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी मौलिक सूचना केल्या.उच्च माध्यमिक शालांत परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होत आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यात ९७ परीक्षा केंद्र निश्चित केले आहे. तर ३ ते २३ मार्च दरम्यान १५६ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होणार आहे. एकूण ८७ हजार १८७ विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा देणार असल्याची माहिती जिल्हा दक्षता समितीचे सदस्य सचिव अजित कुंभार व शिक्षणाधिकारी (मा.) उस्मानी नजमा यांनी या बैठकीत दिली. बीड जिल्ह्यात या परीक्षांसाठी १५ परिरक्षक केंद्र असून परीक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच बैठक पथकही नेमणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.परीक्षा दक्षतेबाबत झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार नियोजन न झाल्यास शिक्षणाधिका-यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.पर्यवेक्षक नियुक्तीबाबत काळजी घ्यावीज्या विषयाचा शिक्षक असेल त्यास सदर विषयाच्या परीक्षेचे पर्यवेक्षकाचे काम देऊ नये. ज्या शाळेत परीक्षा केंद्र आहेत त्या शाळेचा शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करू नये. ज्या शाळेचे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी असणार आहेत, त्या शाळेचे शिक्षक तेथे असणार नाही. कोणत्याही परीक्षा केंद्रावर कोणत्याही शाळेचा एकापेक्षा जास्त शिक्षक पर्यवेक्षक म्हणून असणार नाही, याबाबत काटेकोर अंमल करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
बीड जिल्ह्यातील ९७ केंद्रांवर ४० हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 11:49 PM
बीड : मंगळवारपासून सुरू होणा-या बारावीच्या परीक्षा आयोजनाची पूर्वतयारी पुर्ण झाली असून, ९७ केंद्रांवर ४० हजार ६५१ विद्यार्थी परीक्षा ...
ठळक मुद्देकॉपीमुक्त, तणावमुक्त परीक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश