बीड : रेशन दुकानातून गहू, तांदुळ व धान्य दिले जात होते. मात्र, मार्चमध्ये बाजरी आणि मका देखील मिळणार आहे. मात्र, यामुळे गहू कमी प्रमाणात वाटप केला जाणार आहे. या वाटपासाठी पुरवठा विभागाची तयारी देखील पूर्ण झाली असून, लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र जवळपास ६० हजार हेक्टर आहे. तर, दरवर्षी मका हे पीक ८ ते १० हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. तर, गहू हे पीक साधारण ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. त्यामुळे रेशनवर गहू मिळावा, अशी अपेक्षा लाभार्थ्यांची असते. मात्र, भरड धान्य योजनेअंर्तंग स्वस्त धान्य दुकानावर मार्च महिन्यात बाजरी व मका दिली जाणार आहे. प्राधान्याने कुटुंब व एपीएल शेतकरी यांच्यासाठी २ किलो गहू व ३ किलो तांदुळे दिले जात होते. त्याबदल्यात गहु कमी करून मका किंवा बाजरी दिली जाणार आहे.
बाजरीची भाकरी खाणारे चपाती खाणाऱ्यांच्या तुलनेत कमी आहेत. शिवाय अनेकांच्या शेतात गहु पिकवला जात नसल्यामुळे त्याची आवश्यकता जास्त असते, मात्र, भरडधान्य योजनेचा लाभ रेशनवर मिळणार असल्यामुळे मार्च महिन्यात चपातीऐवजी बाजरीची भाकरी खावी लागणार आहे. तर, मक्यापासून जिल्ह्यात रोटी किंवा रोजच्या जेवणात वापर केला जात नाही. त्यामुळे मका का दिली जात आहे. असा प्रश्न देखील लाभार्थ्यांना पडत आहे. दरम्यान, गहुू व मका तर द्यावीच परंतु गहु देखील द्यावा अशी मागणी लाभार्थ्यांमधून केली जात आहे.
किलोचे दर २ व ३ रुपये
रेशनच्या सर्वच लाभार्थ्यांसाठी २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदुळ दिला जाते. मका आणि बाजरी देखील याच किंमतीत दिली जाणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
पुरवठा विभागाकडून मार्च महिन्यात वाटप करण्यात येणारे बाजरी व मका याचा साठा करण्यात आला आहे. कोणत्या ठिकाणी किती धान्य पाठवायचे याचे नियोजन सुरु असून, नियतनानुसार पुरवठा केला जाईल मच्छिंद्र सुकटे जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी)
प्रक्रिया
लाभार्थ्यांच्या रोजच्या जेवणात भाकरीपेक्षा चपातीचा वापर जास्त केला जातो. तसेच अद्याप शेतातील गहू देखील काढलेला नसल्यामुळे रेशनच्या दुकानावर जेवढा गहू मिळतो तो मार्चमध्ये देखील मिळाला पाहिजे
जयश्री जगताप गृहिणी
प्रतिक्रिया
बाजरी मिळाली तर, भाकरी करून खाता येईल मात्र, मका मिळाली तर त्याचा वापर जेवणात कसा करावा हा प्रश्न आहे. त्यामुळे मक्याचे वाटप करू नये, त्याचा वापर जनावरांच्या खाण्यासाठी केला जाईल,
श्रीकांत डंबरे, शेतकरी
जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिका १४९३०७६
अंत्योदय ४०,२४९
एपीएल शेतकरी ५,४२,५५९
प्राधान्य कुटुंब १४,९३,०७६
रोजच्या जेवणात चपातीचा वापर आम्ही सगळे करतो, गहू