ऋषभ बाळासाहेब चव्हाण (वय २३) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. ऋषभच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
ऋषभ पुण्यातील एका महाविद्यालयात ॲनिमेशनचे शिक्षण घेत होता. मागील काही दिवसांपासून तो अंबाजोगाईत राहत होता. गुरुवारी रात्री सर्व कुटुंबीय झोपी गेल्यानंतर मध्यरात्री त्याने घराच्या हॉलमधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ऋषभची आई नेहमीप्रमाणे उठली असता त्यांना ही दुर्दैवी घटना दिसून आली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर दुपारी ऋषभच्या पार्थिवावर त्याच्या मूळ गावी हातोला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषभच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील बाळासाहेब चव्हाण हे गिरवली येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक आहेत.
===Photopath===
040621\avinash mudegaonkar_img-20210604-wa0094_14.jpg