शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीने घेतला तरुणाचा बळी; दोन महिन्यात दोन कर्त्यापुरुषांच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 14:49 IST

बेरोजगारीमुळे वडिलांच्यानंतर आपण आपल्या कुटुंबाचा सांभाळ ही नीट करू शकत नाहीत, या नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वी वडिलांचे झाले होते अपघाती निधन संचारबंदी लागू झाल्याने युवकाचा रोजगार बंद पडला

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई-: वडिलांच्या अपघाती निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडली. त्यात लॉकडाऊनमुळे काम मिळेना.त्यातच आई आजारी असल्याने तिच्या उपचाराचा खर्च,घरात चार माणसांचा उदरनिर्वाह ही होईना. याचे नैराश्य आल्याने आकाश अशोक सावंत या २१ वर्षीय युवकाने सोमवारी आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्याने सावंत कुटुंब उघड्यावर पडले आहे.

ही दुर्देवी व्यथा सावंत कुटुंबियांच्या नशिबी आली.सगळं काही सुरळीत सुरू होत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी अंबाजोगाई येथील कबीरनगर परिसरात राहणारे वाहन चालक अशोक सावंत यांचे दोन महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुलगा आकाश  व दोन मुली असा परिवार होता.वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जवाबदारी आकाश च्या खांद्यावर आली.तो बांधकामावर सेंटरिंग चे काम करत होता.तर त्याची आई सुनीता या मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवू लागले.परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने कडक संचारबंदी जाहीर केली. कोरोना आणि संचारबंदीच्या भीतीमुळे बांधकामे ही ठप्प राहिली. परिणामी आकाशवर बेरोजगारीची वेळ आली. दुसरेही कामे मिळेनात. आई ही आजारी पडल्याने तिचाही कुटुंबाला लागणारा हातभार बंद झाला. त्यातच आईच्या उपचाराचा खर्च.लोकांकडून शे-पाचशे घेऊन खर्च भागवू लागला. मात्र, काम बंद असल्याने ते परत करायचे कसे? त्यातच उदरनिर्वाहाची दैनंदिन भेडसावू लागली.

चार जणांचे कुटूंब, घरात बसून कसे चालवायचे ? याची मोठी विवंचना आकाशला भेडसावू लागली. आपण आपल्या कुटुंबाचा सांभाळ ही नीट करू शकत नाहीत. या नैराश्यातून आकाशने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन बेरोजगारी व उपासमारीचा तो बळी ठरला.आकाशच्या जाण्याने आज त्याच्या कुटुंबासमोर मोठी भीषण समस्या निर्माण झाली आहे. घरातील दोन्ही पुरुष एका मागे एक निघून गेले. कर्ता व्यक्तीच कुटुंबात राहिला नाही. माय व दोन लेकी एवढेच कुटुंब पाठीमागे राहिले. एकमेव राहिलेला कुटुंबाचा आधार ही निघुन गेला.आता या कुटुंबाची मोठी परवड झाली आहे.

सावंत कुटुंबाला २५ लाखांची मदत करासावंत कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष एका पाठोपाठ निघून गेले.आज या कुटुंबाची मोठी दुर्दशा झाली आहे.अशा स्थितीत त्यांच्या उदरनिर्वाहाची समस्या दूर करण्यासाठी शासनाने सावंत कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत करावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बब्रुवान पोटभरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAmbajogaiअंबाजोगाईBeedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या