गेवराई : माणसांत प्रामाणिकपणा अजून शिल्लक असल्याचा प्रत्यय शहरात मंगळवारी (दि. २५) आला. कटचिंचोली येथील रामभाऊ येवले यांचे हरवलेले सोन्याचे एक ग्रॅमचे मणी सापडल्यानंतर सराफ दुकानाच्या पाकिटाआधारे शोध घेत सराफाच्या मदतीने येवले यांना परत करण्यात आले. हरवलेले सोने सापडल्यानंतर येवले यांचा जीव भांड्यात पडला.
रामभाऊ येवले यांनी शहरातील एका सराफी दुकानातून पाच हजार रुपयांचे मणी विकत घेतले, ते घेऊन गावाकडे जाताना शहरातील शास्त्री चौकात रस्त्यावर पडले. मात्र हे येवले यांच्या ते लक्षात आले नाही. दरम्यान, पडलेले मणी या रस्त्यावरून जाणारे मोहमंद पटेल यांना सापडले. पटेल यांनी सराफ दुकानाच्या पिशवीवरून ते मणी सोन्याच्या दुकानदाराला परत नेऊन दिले. नंतर दुकानदार व मोहमंद पटेल यांनी रामभाऊ येवले यांना बोलावून ते मणी परत केले. त्यामुळे मोहमंद पटेल यांचा येवले व इतरांनी सत्कार केला. यावेळी सराफ व्यापारी संघटनेचे राजेश टाक, मनोज मैड, रामभाऊ येवले, पप्पू नांदेवालीकर, अभिजित ठाकूर, रघुवीर बेदरे यांच्यासह इतर उपस्थित होते.
===Photopath===
270521\2335sakharam shinde_img-20210527-wa0015_14.jpg