शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

तुझा बाप कर्जबाजारी झालाय...अंत्यसंस्काराला ये, म्हणत शेतकरी पित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 2:59 PM

तुझा बाप खूप कर्जबाजारी झाला आहे, घेतलेले कर्ज फेडू शकत नाही, शेतात पीक चांगले आले नाही आता तू सासर वरून लवकर निघ

वडवणी (जि.बीड) : गीताजंली, तुझा बाप कर्जबाजारी झालाय, घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने जीवन असहाय झाले आहे... शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करतोय...लवकर मातीला ये...असे सासरी असणाऱ्या लेकीला मोबाईलवर संभाषण करून कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील चिंचोटी येथे १४ डिसेंबर रोजी सकाळी घडली.

बालासाहेब लक्ष्मण गोंडे (४२, रा. चिंचोटी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची पिंपरखेड शिवारात दीड एकर शेती आहे. १४ रोजी रात्री ते शेतातील गोठ्यात झोपण्यासाठी गेले होते. सकाळी सहा वाजता त्यांनी नांदलगाव येथील विवाहित मुलीला फोन करून गीतांजंली तुझा बाप खूप कर्जबाजारी झाला आहे, घेतलेले कर्ज फेडू शकत नाही, शेतात पीक चांगले आले नाही आता तू सासर वरून लवकर निघ, मी शेतातील झाडालाच गळफास घेऊन आत्महत्या करत आहे, असे म्हणत आत्महत्या केली. गीतांजलीने चुलत भाऊ कालिदास रामकिसन गोंडे यास फोन करून तातडीने शेतात जाण्यास सांगितले. मात्र, ते तेथे पोहोचण्यापूर्वीच बालासाहेब यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

कुटुंबाचा टाहोवडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे दिला. बालासाहेब गोंडे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, तीन मुली व एक मुलगा आहे. दरम्यान, बालासाहेब यांच्या आत्महत्येने कुुटुंबाने एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांचेही डोळ पाणावले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीCrime Newsगुन्हेगारीBeedबीड