शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

सामाजिक उत्तरदायित्वासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा : नमिता मुंदडा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:30 AM

अंबाजोगाई : येथील कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्ष तथा जिमखान्याच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन ...

अंबाजोगाई : येथील कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्ष तथा जिमखान्याच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी वनामकृविचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, तर उद्घाटक म्हणून आमदार नमिता मुंदडा उपस्थित होत्या.

यावेळी व्यासपीठावर माजी कुलसचिव डाॅ. दिगंबरराव चव्हाण, उषा ढवण, माजी सरपंच वसंतराव मोरे, वैजनाथ देशमुख, सुदाम पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे उपस्थित होते.

यावेळी उद्घाटक म्हणून आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या की, जागतिक पर्यावरणाची योग्य काळजी घेण्याचे सामर्थ्य हे कृषीच्या विद्यार्थ्यांत आहे. कृषी अभ्यासक्रमाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. आपल्या ज्ञानाचा वापर करून तसेच सामाजिक जाणिवेतून कृषी युवकांनी सामाजिक उत्तरदायित्व जोपासावे, असेही त्या म्हणाल्या. कृषी महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी व्यासंगी आणि अभ्यासू असले पाहिजे. मोठी स्वप्ने पाहून ते साध्य करण्यासाठी त्या दिशेने योग्य ती पावले टाकली पाहिजेत. वाचन संस्कृतीचे जतन करावे, कृषीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आकांक्षांची क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी अविरत ग्रंथ वाचन करावे, असे प्रतिपादन वनामकृविचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. प्रारंभी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाचा आढावा सादर केला तसेच स्वच्छ, सुंदर व हरित परिसर संकल्पनेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात संभाजी हनुमंत गवळी, सूरज श्रीराम पोकळे, गणेश मधुकर कराड, पवन रामराव ठोंबरे, अनिल देवीदास पवार, भागवत बबन जायभाये, प्रियंका शिवाजी नखाते, भक्ती विजय पवार, सोनाली शिवाजी जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांकडून गौरव करण्यात आला. यासोबतच सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांनी कोरोनाकाळात समाजातील गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल मान्यवरांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन राजेश रेवले यांनी तसेच गुणगौरव सोहळ्याचे संचालन सहायक प्रा. डाॅ. नरेशकुमार जायेवार यांनी, तर उपस्थितांचे आभार सहयोगी प्राध्यापक डाॅ. दीपक लोखंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ. अरुण कदम, डाॅ. प्रताप नाळवंडीकर, डाॅ. बसवलिंगआप्पा कलालबंडी, प्रा. सुनील गलांडे, डॉ. सुहास जाधव, डॉ. नरेंद्र कांबळे, डॉ. नरेशकुमार जायेवार, डाॅ. विद्या तायडे, डाॅ. योगेश वाघमारे, अनंत मुंढे, सुनील गिरी यांनी परिश्रम घेतले.