कार्यक्रमाचे बक्षीस वितरण व समारोप मंगळवारी प्रशालेत करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश शिंदे, तर समीर पठाण, मधुकर केदार, संदीप गाडेकर, कैलास गायके, सतीश मुरकुटे उपस्थित होते. प्रास्ताविक चंदा धाबे यांनी केले. मधुकर केदार यांनी स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. समीर पठाण यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त कायद्याविषयी मार्गदर्शन केले. बी. ई. पवार यांनी ‘यशस्वी व्यक्तीचे अनुभव कथन’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
वक्तृत्त्व स्पर्धा : मारिया पठाण (प्रथम), ऋतुजा खेडकर (द्वितीय), सायली गाडेकर (तृतीय), निबंध स्पर्धा : प्रणव घोरपडे (प्रथम), साक्षी भिसे (द्वितीय), ऋतुजा खेडकर (तृतीय) यांनी बाजी मारली. सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेचे मुख्याध्यापक व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते शालेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षक भिवसेन पवार, दत्ता गाडेकर, अरुणा ढगे, वंदना गाडेकर, शांताबाई तावरे, दीपा खेडकर, द्वारका पालकर, छाया घोडके, संगीता वारे, संध्या नागरे, रामनाथ हंगे, प्रल्हाद गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली गाडेकर व ऋतुजा खेडकर यांनी केले, तर आभार दीपा खेडकर यांनी मानले.