अंकशास्त्र एखाद्या व्यक्तीच्या सामर्थ्यावर आणि उणीवांवर खोलवर प्रकाश टाकतो. एक ते नऊ क्रमांक समजून घेतल्यास एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेता येतो. त्यासाठी मदत होते ती मूलांकाची. मूलांक अर्थात आपल्या जन्मतारखेची बेरीज. उदा- तुमची जन्मतारीख १ असेल तर ०+१ म्हणजे मूलांक एक आणि जन्मतारीख २९ असेल तर २+९ म्हणजे ११ मग पुन्हा १+१ म्हणजे मूलांक २ अशी संक्षिप्त बेरीज करून मूलांक मिळवला जातो. हा मूलांक कळला असता व्यक्तीच्या स्वभावानुसार त्याच्याशी मैत्री करताना सावध पवित्रा घेता येतो.पैकी एक, पाच, सहा, सात आणि नऊ मूलांक असलेल्या व्यक्ती अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण असतात. कशा ते पाहूया.
१ मूलांक असलेले लोक चांगले मित्र असतात. त्यांचा स्वभाव बोलका असतो. त्यांना लोकांना भेटायला आवडते. बोलायला आवडते. चार चौघात त्यांचे बोलणे उठावदार असते. त्यांच्या बोलण्याची समोरच्यावर छाप पडते. १ मूलांकावर सूर्यदेवाचा प्रभाव असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात एकप्रकारचे तेज दिसून येते.
५ मूलांक असलेली व्यक्ती बोलण्यात तरबेज असते. आपल्या मधुर वाणीने लोकांना सहज आपलेसे करते. मित्र जोडते. अशा लोकांशी बोलून समोरच्यालाही आनंद होतो. वाद मिटवण्यात ते पटाईत असतात. त्यांचा लोकसंग्रह दांडगा असतो. ते इतरांना नेहमी प्रोत्साहन देतात.
६ मूलांक असणारी व्यक्ती आकर्षक असते. कारण ६ अंक हे चन्द्रस्थान आहे. त्या अंकावर आणि हा मूलांक असलेल्या लोकांवर चंद्रप्रभा दिसून येते. त्यांना कलेत गती असते. त्यामुळे सभा जिंकण्यात ते तरबेज असतात.उत्तम निवेदन करू शकतात. त्यांच्यात सभाधिटपणा असल्यामुळे ते चारचौघात उठून दिसतात आणि बोलण्यामुळे लोकप्रिय होऊन सर्वांना हवेहवेसे वाटतात.
७ हा मूलांक केतू ग्रहाचा निर्देशक आहे. केतू ग्रह विश्वास संपादन करण्याबाबत ओळखला जातो. त्यामुळे ७ मूलांक असलेली व्यक्ती मैत्री किंवा अन्य कोणतेही नाते निभावण्याच्या बाबतीत अग्रेसर असते आणि विश्वासू अशी त्यांची ओळख असते. त्यांचा मित्र परिवार मोजका पण अतूट नात्यांनी जोडलेला असतो.
९ हा मूलांक मंगळ ग्रहाचा आहे. मंगल ग्रहाचा स्वभाव म्हणजे सगळं काही निवांत, शांत, आरामात. परंतु तेवढेच तापट. परंतु मित्रांसाठी जीवाला जीव देणारे असतात. त्यांच्या उशीर करण्याच्या वृत्तीमुळे ते नेहमी बोलणी खातात, परंतु त्यांच्याशिवाय पान हलत नाही, एवढे ते सगळ्यांचे लाडके असतात. ९ मूलांक असलेले लोक मित्र परिवारात रमणे जास्त पसंत करतात त्यामुळे ते सर्वांना हवेहवेसे असतात.