दर ठराविक दिवसांनी किंवा महिन्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यातून जगबुडीची हूल उठवली जाते आणि त्यावर चर्चा रंगतात. आपल्या जन्मापासून आपणही निदान दहा-बारा वेळा तरी जगबुडीच्या वार्ता ऐकल्या असतील. परंतु, खरोखरच असे काही होणार आहे का? असेल तर कधी ? याबाबत एके ठिकाणी माहिती मिळाली. पंचांगातील माहितीच्या आधारे ती विश्वसनीयदेखील वाटू लागली. त्यात काय म्हटले आहे ते पाहू-
सृष्टीला चार युगात वाटले आहे. १. सतयुग २. त्रेतायुग ३. द्वापर युग ४. कलियुग
या चार युगाचे आयुर्मान खालीलप्रमाणे दिले आहे.सतयुग : १७,२८,०००त्रेता युग : १२,९६,०००द्वापर युग : ८,६४,०००कलियुग : ४,३२,०००
आता आपण कलियुगात जगत आहोत आणि ते संपायला अजून पुष्कळ अवकाश आहे. नवीन वर्षाच्या दाते पंचांगात तसे स्पष्ट नमूद केले आहे, की कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५१२२ वर्षे मागे पडली व ४ लक्ष २६ हजार, ८७८ वर्षे शिल्लक आहेत. एवढ्या कालावधीत आपण ८४ लक्ष योनी फिरून जन्म मृत्यूचे चक्र पार करतो. त्याचाही हिशोब दिला आहे.
एकूण जन्म : ८४ लक्षफुल झाडे वनस्पती : ३० लक्षकिटक : २७ लक्षपक्षी : १४ लक्ष पाण्यातील जीव जंतू : ९ लक्षपशू : ४ लक्ष
या क्रमाने जन्म मृत्यू चालतो आणि या चक्राबरोबर युगाची परिक्रमा सुरू राहते आणि तिचा कालावधी पूर्ण झाला की युग संपते. त्यामुळे जगबुडीची वाट बघू नका. ती व्हायची तेव्हा होईलच. तूर्तास आपण आजवर लक्ष केंद्रित करूया आणि आपले भविष्य सुरक्षित ठेवूया.