जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी चुकत असल्यासारखे अस्वस्थ वाटत असेल. तर एकदा वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील बाथरूमची ठेवण कशी असावी याकडे लक्ष द्या. तुमच्या घरात आनंद आणि मन:शांती आणण्यात तुमचे बाथरूम महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र प्रत्येकजण आपल्या घरातील बाथरूमची काळजी घेत नाही. वास्तूनुसार बाथरूम लोकांच्या आयुष्यात सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करते. तुम्हाला माहित आहे का? तुमच्या बाथरूममध्ये असलेली रिकामी बादली ठेवणे आणि तिचा रंग यामुळे खूप फरक पडतो. जाणून घेऊया कसा..
बाथरूममधील रिकामी बादली बनू शकते गरिबीचे कारणवास्तुशास्त्रानुसार, आंघोळ केल्यानंतर बाथरुममध्ये बादली रिकामी ठेवणे अशुभ मानले जाते. वास्तूनुसार जर तुम्ही बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवली तर त्यामुळे तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकते, घरात पैशाची चणचण भासू शकते आणि माणूस गरीब होऊ शकतो. त्यामुळे अंघोळ केल्यानंतर बादलीत पाणी ठेवावे. तसेच बाथरूममध्ये एकापेक्षा जास्त बादली ठेवू नका.
बाथरूममध्ये ठेवावी निळ्या रंगाची बादलीवास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवावी. हे शुभ संकेत असल्याचे सांगितले जाते. वास्तुशास्त्र तज्ञांच्या मते, निळ्या रंगात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची क्षमता असते. मनाला आनंद देणारा हा रंग आहे. हा रंग आपल्याला व्यापक जगात मुक्त असल्याची भावना देतो.
बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते, तुम्हाला आनंद आणि मनःशांती मिळते. त्याचबरोबर तुम्ही चांगले निर्णय घ्याल आणि परिणामी तुम्हाला चांगले पैसे मिळतील.